रोहित-इशांत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार? टीम इंडियाच्या डोकेदुखीत वाढ

रोहित आणि इशांत शर्मा या दोन्ही खेळाडूंची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे. हे दोन्ही खेळाडू बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) फिटनेस ट्रेनिंग घेत आहेत.

रोहित-इशांत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार? टीम इंडियाच्या डोकेदुखीत वाढ
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 2:45 PM

मुंबई : हिटमॅन रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखापतीमुळे आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून (India tour of Austrellia 2020) वगळले होते. त्यामुळे त्याचे चाहते कमालीचे नाराज झाले होते. मात्र दुसरीकडे दुखापतग्रस्त असूनदेखील तो आयपीलमध्ये (IPL 2020) मुंबईच्या (Mumbai Indians) संघाकडून मैदानात उतरला. आयपीएलच्या फायनलमध्ये अर्धशतक ठोकून त्याने त्याचा फॉर्मही दाखवला. यावरुन अनेकांनी बीसीसीआयवर (BCCI) टीकेची झोड उठवली. (IND vs AUS : Rohit Sharma and Ishant Sharma ruled out from first 2 tests)

खेळाडूंचे मेडिकल रिपोर्ट्स आल्यानंतर मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात काही बदल करण्यात आले. त्यामध्ये रोहित शर्माला कसोटी संघात स्थान देण्यात आलं. त्यामुळे रोहितचे चाहते सुखावले होते. परंतु आता अशी बातमी समोर आली आहे की, रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पहिले दोन कसोटी सामने खेळू शकणार नाही.

आयपीएलमध्ये खेळताना रोहितच्या गुडघ्याचे स्नायू दुखावले होते. त्यातून रोहित आता सावरत आहे. तो सध्या बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) फिटनेस ट्रेनिंग घेत आहेत. रोहितप्रमाणेच टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज इशांत शर्मादेखील दुखापतग्रस्त झाला होता. त्याचीदेखील कसोटी संघात निवड करण्यात आली असून तो एनसीएमध्ये सराव करतोय. फिटनेस ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर दोन्ही अनुभवी खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत.

कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने बनवलेले क्वारन्टिनसंबंधित नियम आणि सध्याची परिस्थिती पाहता आतापर्यंत दोन्ही खेळाडूंना ऑस्ट्रेलियाला जाण्याची परवानगी मिळायला हवी होती. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितल्याप्रणाणे दोन्ही खेळाडूंना जास्त दिवस भारतात राहावे लागले तर आपल्या अडचणी वाढू शकतात. ट्रेनिंग पूर्ण करुन दोघे ऑस्ट्रेलियात येणार. त्यानंतर क्वारन्टिन कालावधी पूर्ण करतील आणि त्यानंतरच दोन्ही खेळाडू कसोटी मालिका खेळण्यासाठी उपलब्ध होतील, असे शास्त्री यांनी सांगितले होते.

रोहित आणि इशांतचं फिटनेस ट्रेनिंग पूर्ण झालेलं नाही. त्यास अजून किती वेळे लागेल याबाबत एनसीएकडून काहीही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे कोच रवी शास्त्रींनी व्यक्त केलेली भीती खरी ठरली आहे. रोहित आणि इशांत ऑस्ट्रेलियाला कधी रवाना होणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यासाठी चार-पाच दिवस किंवा त्याहून अधिक कालावधी लागला तर हे दोन्ही खेळाडू पहिले दोन कसोटी सामने खेळण्यासाठी उपलब्ध नसतील.

टीम इंडियाच्या डोकुदुखीत वाढ

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) गर्भवती आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात अनुष्का शर्मा आणि विराट आई-बाबा होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विराटने बीसीसीआयकडे पॅटनिर्टी लिव्हसाठी अर्ज केला होता. बीसीसीआयने विराटची रजा मंजूर केली आहे. त्यामुळे विराट टीम इंडियासाठी दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत खेळताना दिसणार नाही. अशात आता संघातील दोन अनुभवी खेळाडू (रोहित आणि इशांत) पहिले दोन सामने खेळण्यासाठी उपलब्ध नसतील, त्यामुळे कांगारुंविरुद्धची मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रवास अजून खडतर होणार आहे. विराट, रोहित, इशांत या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची संपूर्ण मदार उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा या दोघांच्या खांद्यावर असणार आहे.

संबंधित बातम्या

Rohit Sharma | नेतृत्वाबाबत विराट कोहलीपेक्षा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा वरचढ : पार्थिव पटेल

Brain Lara | सूर्यकुमार यादव क्लास खेळाडू, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याला संधी मिळायला हवी होती : ब्रायन लारा

India vs Australia 2020 | शुभमन गिल की मयांक अग्रवाल, धवनसोबत सलामीला कोण उतरणार?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.