Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : कांगारुंविरुद्ध खेळण्यासाठी हिटमॅन सज्ज, टीम मॅनेजमेंटसह चाहते सुखावले

ऑस्ट्रेलिया दोऱ्यासाठी रोहित शर्माने बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेस ट्रेनिंगला सुरुवात केली आहे.

IND vs AUS : कांगारुंविरुद्ध खेळण्यासाठी हिटमॅन सज्ज, टीम मॅनेजमेंटसह चाहते सुखावले
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 4:00 PM

बंगळुरु : हिटमॅन रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखापतीमुळे आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून (India tour of Austrellia 2020) वगळले होते. त्यामुळे त्याचे चाहते कमालीचे नाराज झाले होते. मात्र दुसरीकडे दुखापतग्रस्त असूनदेखील तो आयपीलमध्ये (IPL 2020) मुंबईच्या (Mumbai Indians) संघाकडून मैदानात उतरला. आयपीएलच्या फायनलमध्ये अर्धशतक ठोकून त्याने त्याचा फॉर्मही दाखवला. यावरुन अनेकांनी बीसीसीआयवर (BCCI) टीकेची झोड उठवली. खेळाडूंचे मेडिकल रिपोर्ट्स आल्यानंतर मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात काही बदल करण्यात आले. त्यामध्ये रोहित शर्माला कसोटी संघात स्थान देण्यात आलं. (IND vs AUS Rohit Sharma begins Fitness training at NCA for Australia Tour)

ऑस्ट्रेलिया दोऱ्यासाठी रोहित शर्माने फिटनेस ट्रेनिंग सुरु केली आहे. बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) रोहितने आजपासून (19 नोव्हेंबर) फिटनेस ट्रेनिंगला सुरुवात केली आहे. रोहितला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकांमधून विश्रांती देण्यात आली आहे. आयपीएलमधील सामन्यांमध्ये रोहितने केलेल्या कामगिरीमुळे आणि दुखापतीनंतरही आयपीएल फायनलमध्ये रोहितने शानदार अर्धशतक झळकावल्यामुळे बीसीसीआयच्या निवड समितीने रोहितला भारताच्या कसोटी संघात स्थान दिलं आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अ‌ॅडलेडमधल्या पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. जानेवारी महिन्यात तो बाबा होणार आहे. बीसीसीआयकडून विराटची पॅटनिर्टी लिव्ह मंजूर करण्यात आली आहे. विराटच्या अनुपस्थितीत संघात भरवशाचा फलंदाज असावा, असा विचार करुन निवड समितीने रोहितला संघात स्थान दिले असल्याची चर्चा आहे.

कांगारुंविरुद्ध रोहितचे दमदार रेकॉर्ड्स

एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त रेकॉर्ड्स आहेत. रोहितने कांगारुंविरुद्ध खेळताना 40 डावांमध्ये आठ शतकांसह 2208 धावा फटकावल्या आहेत. या धावा त्याने 61.33 च्या सरासरीने आणि 93.87 जबरदस्त स्ट्राईक रेटने जमवल्या आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक सरासरी रोहित शर्माचीच आहे. रोहितनंतर एबी डिविलियर्स, विराट कोहली, क्लाइव्ह लॉयड, फॅफ डु प्लेसी आणि विवियन रिचर्ड्स यांचे नंबर लागतात.

कांगारुंच्या भूमीवरही रोहितच सर्वोत्तम आहे. रोहितने ऑस्ट्रेलियात खेळलेल्या 30 डावांमध्ये 90.58 च्या स्ट्राईक रेटने आणि 53.12 च्या सरासरीने 1328 धावा फटकावल्या आहेत. त्याने ऑस्ट्रेलियात पाच शतकं ठोकली आहेत.

हिटमॅनचे आकडेच सर्व काही सांगतात, त्या कर्णधार करा; नासिर हुसैन

नासिर हुसैन म्हणाला की, रोहित अगदी शांत डोक्याने संघाचे नेतृत्व करतो. रोहित योग्यवेळी योग्य निर्णय घेतो. रोहितचा मुंबईबरोबर फार चांगला काळ गेला आहे. विराटने टी 20 मधून कर्णधार पदाचा राजीनामा द्यावा. तसेच रोहितने नव्याने ही जबाबदारी स्वीकारावी.कर्णधार म्हणून रोहितचे आकडेच सर्व काही सांगतात.

नासिरने रोहितच्या फलंदाजीचंही कौतुक केलं. रोहित लिमिटेड ओव्हर क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक आहे. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक लगावण्याची अफलातून कामगिरी केली आहे. टी 20 क्रिकेटमध्ये रोहित काही वेळा अपयशी ठरला. मात्र त्याने अंतिम सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे, असंही नासिरने या वेळेस नमूद केलं.

संबंधित बातम्या

रोहित शर्माला कर्णधारपद न दिल्यास टीम इंडियाचं नुकसान, कोहलीवरील टीकेनंतर गंभीरचा नवा पर्याय

India vs Australia 2020 | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराटला सचिनचे हे 2 विक्रम मोडित काढण्याची संधी

INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा

(IND vs AUS Rohit Sharma begins Fitness training at NCA for Australia Tour)

मी दुर्लक्ष केलं...कामराने उलडवलेल्या खिल्लीनंतर शिंदे स्पष्टच म्हणाले
मी दुर्लक्ष केलं...कामराने उलडवलेल्या खिल्लीनंतर शिंदे स्पष्टच म्हणाले.
कामराची माफी नाहीच...शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पहिलं ट्वीट काय?
कामराची माफी नाहीच...शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पहिलं ट्वीट काय?.
शिव्या देतो माझ्या छातीला..,माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून चोप
शिव्या देतो माझ्या छातीला..,माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून चोप.
धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात
धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात.
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....