IND vs AUS : जडेजाच्या सांगण्यावरून रोहित शर्माने घेतला DRS आणि पंचांना आलं हसू, दिनेश कार्तिक म्हणाला…! काय झालं पाहा Video

बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व आहे. उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीन या जोडीनं तर भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं.

IND vs AUS : जडेजाच्या सांगण्यावरून रोहित शर्माने घेतला  DRS आणि पंचांना आलं हसू, दिनेश कार्तिक म्हणाला...! काय झालं पाहा Video
Video : जडेजा आणि रोहित शर्माच्या 'त्या' डीआरएस रिव्ह्यूवरून दिनेश कार्तिकने घेतली फिरकी, म्हणाला "टीव्ही अंपायर..."Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 3:28 PM

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर मालिकेतील शेवटचा सामना सुरु आहे. दुसऱ्या दिवशी कांगारूंनी सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवणं भारताला कठीण असल्याचं दिसत आहे. इतकंच काय तर सामना वाचवण्याची धडपड करावी लागेल असं काही क्रीडा जाणकारांचं म्हणणं आहे. उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीननं तर भारतीय गोलंदाजांना फेस आणला. पाचव्या गड्यासाठी दोघांनी 208 धावांची भागीदारी केली. ही जोडी फोडण्यासाठी भारतीय गोलंदाज आपली सर्व शक्ती पणाला लावत होते. मात्र यश काही मिळत नव्हतं. इतकंच काय तर एक डीआरएस रिव्ह्यू वाया घालवण्याची वेळ देखील आली.

कर्णधार रोहित शर्मानं 128 वं षटक रविंद्र जडेजाच्या हाती सोपवलं होतं. रविंद्र जडेजानं उस्मान ख्वाजाला बाद करण्यासाठी ऑफ स्टंपबाहेर आत येणार चेंडू टाकला. पण यावेळी जडेजाने जोरदार अपील केली. मैदानातील पंच रिचर्ड केटलबोरो यांनी नॉट आउट असल्याचं सांगितलं.पण त्यानंतर रविंद्र जडेजानं कसं बसं कर्णधार रोहित शर्मानं पटवलं आणि रिव्ह्यू घेण्यास भाग पाडलं.

रिव्ह्यूमध्ये दिसलं की चेंडू ऑफ स्टंपपेक्षा खूपच लांब आहे. हा व्हिडीओ स्क्रिनवर पाहिल्यानंतर भारतीय खेळाडूंना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली. इतकंच काय मैदानातील पंच रिचर्ड केटलबोरो हे सुद्धा आपलं हसू रोखू शकले नाहीत. थर्ड अम्पायर जयाराम मदनगोपाळ यांनी त्यांना त्यांचा निर्णय कायम ठेवण्यास सांगितलं.

समालोचन करत असलेल्या रवि शास्त्री, दिनेश कार्तिक आणि मॅथ्यू हेडन या डीआरएस रिव्ह्यूबद्दल धक्काच बसला. दिनेश कार्तिक म्हणाले, “ते लोक चेक करत होते की थर्ड अंपायर झोपलाय की नाही.” त्यानंतर आर. अश्विनला ही जोडी आठवड्यात यश आलं. अश्विनने कॅमरुन ग्रीनला 114 धावांवर असताना बाद केलं.

उस्मान ख्वाजानं 422 चेंडू खेळत 180 धावांची खेळी केली. तर कॅमरुन ग्रीननं 170 चेंडूत 114 धावा केल्या. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी 208 धावांची खेळी केली. भारताकडून मोहम्मद शमीने 2, आर. अश्विनने 4, रविंद्र जडेजा 1 आणि अक्षर पटेलने 1 गाडी बाद केला.

दोन्ही संघाचे खेळाडू

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.