IndvsAus : सूर्यकुमार यादव याने दुसऱ्या कसोटीआधी सांगितलं त्याच्या प्रतिस्पर्ध्याचं नाव, पाहा कोण आहे?

पहिल्या सामन्यामध्ये पदार्पण करणाऱ्या भारताचा मिस्टर 360 डिग्री प्लेअर सूर्यकुमार यादवने एक सिक्रेट शेअर केलं आहे.

IndvsAus : सूर्यकुमार यादव याने दुसऱ्या कसोटीआधी सांगितलं त्याच्या प्रतिस्पर्ध्याचं नाव, पाहा कोण आहे?
suryakumar-yadavImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 4:05 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर पार पडणार आहे. या मैदानाला आता अरूण जेटली क्रिकेट स्टेडिअम असं नाव देण्यात आलं आहे. चार सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतीय संघाने पहिली कसोटी जिंकत मालिकेमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यामध्ये पदार्पण करणाऱ्या भारताचा मिस्टर 360 डिग्री प्लेअर सूर्यकुमार यादवने एक सिक्रेट शेअर केलं आहे. आपल्या धुंवाधार फलंदाजीने सर्वांना भूरळ पाडणाऱ्या सूर्याने मोठी गोष्ट आपल्या चाहत्यांना सांगितली आहे.

सूर्यकुमार यादव पहिल्या चेंडूपासूनच सेट होऊन आलेला दिसतो. समोर कोणताही बॉलर असो त्याला काही घेणदेणं नसतं. सूर्याला फक्त एकच माहित असतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे घालवायचा आहे. सूर्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने सांगितलं आहे की त्याची स्पर्धा कोणाशी असते.

नक्की काय म्हणाला सूर्या?

सूर्याने पोस्ट शेअर करताना, It’s always me vs this guy असं म्हणत त्याचाच एक फोटोही ट्विट केला आहे. माझा प्रतिस्पर्धी दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वत: च असल्याचं सूर्याने म्हटलं आहे. सूर्यकुमारने क्रिकेटमध्ये आपली वेगळी छाप पाडली आहे. उद्याच्या म्हणजेच शुक्रवारी सूरू होणाऱ्या कसोटीमध्ये सूर्याला अंतिम 11 मध्ये स्थान मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे.

भारताचा युवा खेळाडू श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरला असून तो माघारी परतला आहे. श्रेयस अय्यरच्या येण्यामुळे सूर्याला बाहेर बसवण्यात येऊ शकतं. सूर्याने टी-20 मध्ये इंग्लंडचा स्ट्राईक बॉलर जोफ्रा आर्चरला सिक्स मारत केलेलं पदार्पण प्रत्येक चाहत्याच्या लक्षात आहे. सूर्याला आपल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये फारशी चमक दाखवता आली नाही.

दरम्यान, भारताने पहिला कसोटी सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकला आहे. दुसरा सामनाही जिंकत सीरीजमध्ये 2-0 ने आघाडी घेण्याचं रोहित अँड कंपनीचं लक्ष्य असणार आहे.

दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुहमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल , कुलदीप यादव , रवींद्र जडेजा , मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज आणि उमेश यादव.

टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा.
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी.