IND Vs AUS | ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत टीम इंडियाला ‘या’ खेळाडूची उणीव जाणवेल : संजय मांजरेकर

टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे.

IND Vs AUS | ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत टीम इंडियाला 'या' खेळाडूची उणीव जाणवेल : संजय मांजरेकर
Follow us
| Updated on: Dec 13, 2020 | 12:24 PM

सिडनी : एकदिवसीय आणि टी 20 मालिकेनंतर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया  (India Vs Australia 2020-21 Test Series)  यांच्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. गेल्या दौऱ्यात टीम इंडियाने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-1 अशा फरकाने विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळेसही टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्याचा मानस असेल. तर पुनरागमन करत मागील पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाचा असेल. इशांत शर्माला (Ishant Sharma) दुखापतीमुळे या कसोटी मालिकेला मुकावं लागलं. या मालिकेत टीम इंडियाला इशांतची उणीव भासेल, असं मत टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकरने व्यक्त केलं आहे. IND Vs AUS Team India will miss Ishant Sharma in the Test series against Australia

मांजरेकर काय म्हणाला?

टीम इंडियाला तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या रुपात इशांत शर्माची उणीव भासेल. गेल्या काही वर्षांपासून मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह उत्तम सीम गोलंदाजी करतायेत. या दोघांसह टीम इंडियाला आउटसाइड ऑफ स्टंप गोलंदाजी करुन विरोधी संघावर दबाव आणणाऱ्या गोलंदाजाची आवश्यकता आहे. आणि ही अशी कामगिरी इशांतने उत्तमरित्या केली असती, असं मांजरेकर म्हणाला.

“इशांत टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. इशांतने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या गोलंदाजीत सकारात्मक बदल केले आहेत. इंशात सातत्याने आउट साइड ऑफ स्टंप गोलंदाजी करु शकतो. इशांतने अनेकदा 5 विकेट्स घेतल्या आहेत”, असंही मांजरेकर म्हणाला.

इशांतने ऑस्ट्रेलियाविरोधातील मागील कसोटी मालिकेत 11 विकेट्स घेतल्या होत्या. इशांत यावेळेस दुखापतीमुळे उपलब्ध नसेल. त्यामुळे इशांतच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहवर गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. शमीने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत 16 तर बुमराहने 21 विकेट्स घेतल्या होत्या.

इशांतच्या पायाच्या घोट्याला दुखापत

या वर्षी जानेवारीत इशांतला वडोदराविरुद्धच्या रणजी सामन्यात पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. या दुखापतीचा त्रास इशांतला अजूनही होतोय. तसेच इशातंला आयीपीएलदरम्यान डाव्या बाजूच्या बरगडीला दुखापत झाली होती. त्यामुळे इंशातला पुढील सामन्यात मुकावे लागले होते. इशांतला 7 ऑक्टोबरला नेट्समध्ये सरावादरम्यान ही दुखापत झाली होती. इशांतच्या दुखापतीची माहिती दिल्ली कॅपिटल्सच्या ट्विटर हॅंडलवरुन देण्यात आली होती.

कसोटी मालिका 17 डिसेंबरपासून

टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या टीम इंडियाने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकते ऑस्ट्रेलियावर 2-1 अशा फरकाने विजय मिळवला होता. दरम्यान यावेळेस विराट पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. बाबा होणार असल्या कारणाने बीसीसीआयने विराटला पालकत्वाची रजा मंजूर केली आहे.

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

भारतीय कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज

संबंधित बातम्या :

संजय मांजरेकरांकडे काही काम नाही, त्यांना मुंबईशिवाय काही दिसत नाही; के. श्रीकांत यांची टीका

IND Vs AUS Team India will miss Ishant Sharma in the Test series against Australia

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.