IND vs AUS : शुभमन गिलच्या षटकारानंतर जबरदस्त ड्रामा, नेमकं काय झालं पाहा Video
चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाने 480 धावा करत भारतासमोर मोठं आव्हान ठेवलं आहे. दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात जबरदस्त ड्रामा पाहायला मिळाला.
मुंबई : भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यातील दुसरा दिवशी आस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगलंच झुंजवलं. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 480 धावा केल्या. त्यामुळे भारताला हे आव्हान गाठण्याचं मोठं आव्हान आहे. त्यासाठी भारतानं दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात सावध खेळी केली. दुसरा दिवस अखेर भारताने बिनबाद 36 धावा केल्या. रोहित शर्मा नाबाद 17 आणि शुभमन गिल नाबाद 18 धावांवर खेळत आहे. पण या सामन्यात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. या सामन्यात शुभमन गिलने षटकार ठोकला आणि ड्रामा सुरु झाला.
भारत फलंदाजी करत असताना दहाव्या षटकात गिलनं पुढे येत लायनला षटकार ठोकला. हा चेंडू साईट स्क्रिनच्या पांढऱ्या पडद्याला आदळला आणि अडकला. त्यामुळे हा चेंडू काढण्यासाठी धडपड सुरु झाली. मात्र चेंडू कुठेच दिसत नसल्याने नवा चेंडू मागवण्यात आला. तेव्हा एक फॅन्सने तिथे एंट्री मारली. क्रिकेट फॅन्सने प्रयत्नांची पराकाष्ठा करत चेंडू शोधून दाखवला. त्याने चेंडू शोधताच मैदानात एकच जल्लोष झाला. समालोचक रवि शास्त्री यांनी त्याचं कौतुक केलं. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
@ShubmanGill ??? pic.twitter.com/qoSNlSKPGb
— vipan (@vipanshoor) March 10, 2023
He's found the ball! pic.twitter.com/mmX44918mp
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 10, 2023
दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने 33 चेंडूत नाबाद 17 धावा केल्या आहेत. यात दोन चौकारांचा समावेश आहे. शुभमन गिलने 27 चेंडूत नाबाद 18 धावा केल्या. यात एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या. उस्मान ख्वाजाने 180 धावांची खेळी केली. कॅमरुन ग्रीननेही पहिलं शतक ठोकलं. त्याने 114 धावा केल्या. आर. अश्विनने या डावात 6 गडी बाद नवा विक्रम रचला आहे. बॉर्डर गावसकर मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा मान त्याला मिळाला आहे.
भारतासाठी चौथा कसोटी सामना खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यातील विजयावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच निश्चित होणार आहे. कारण मालिकेत 3-1 अशी स्थिती असल्यास थेट अंतिम फेरीत स्थान मिळणार आहे. दुसरीकडे, श्रीलंका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या रेसमध्ये आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.