INDvsAUS : तिसऱ्या कसोटीआधी रोहित शर्माचं टेन्शन वाढलं?’ या’ घातक बॉलरची संघात एन्ट्री

तिसऱ्या कसोटी सामन्याला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याआधी रोहित शर्मासाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

INDvsAUS : तिसऱ्या कसोटीआधी रोहित शर्माचं टेन्शन वाढलं?' या' घातक बॉलरची संघात एन्ट्री
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 6:32 PM

IND VS AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील पहिल्या दोन्ही कसोटी भारतीय संघाने आपल्या नावावर केल्या आहेत.टीम इंडियाने पाच दिवस चालणाऱ्या कसोटी पाच दिवसांच्या आतच आपल्या खिशात घातल्या आहेत. तिसऱ्या कसोटी सामन्याला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याआधी रोहित शर्मासाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार बॉलर तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये खेळण्याची शक्यता आहे. याबाबत मिचेल स्टार्कने स्वत: माहिती दिली आहे.

मला बरं वाटतं असून मला वाटत नाही की लगेच 100 टक्के म्हणजेच पूर्णपणे फिट होईल. यासाठी थोडा वेळ हा लागणारच आहे. बॉल हातातून चांगल्या प्रकारे सुटत आहे त्यामुळे मी जीव ओतून बॉलिंग करत आहे. याआधीही अनेकवेळा काही त्रास होत असताना काही कसोटी खेळल्या आहेत, असं मिचेल स्टार्कने म्हटलं आहे. स्टार्कलाही भारतीय वेगवान गोलंदाजांसारखं आपल्या संघात योगदान देण्याची इच्छा आहे.

डावखुऱ्या वेगवान गोलंदासाठी भारतीय खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करणं आव्हानात्मक आहे. कारण भारतात स्पिनर्सचा भूमिका महत्त्वाची असते. सामन्यामध्ये 20 विकेट्स घेण्यासाठी स्पिनर्ससोबत वेगवान गोलंदाजांनाही मदत करावी लागेल, असं स्टार्कने म्हटलं आहे. तिसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियासमोर स्टार्क आणि ग्रीन हे दोन पर्याय असणार आहेत. कर्णधार पॅट कमिन्स त्याच्या आई आजारी असल्याने मायदेशी परतला आहे. त्या जागी मिचेल स्टार्कला संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, मिचेल स्टार्क हा भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण स्टार्क डावखुरा गोलंदाज असल्यान रोहित शर्माला तो आपल्या गोलंदाजीने सापळ्यात अडकवू शकतो. स्टार्कला भारतामध्ये गोलंदाजी करण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे आता स्टार्क संघात तिसऱ्या कसोटीआधी खेळतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.