India tour Australia | ऑस्ट्रेलियन संघात निवड होताच युवा बोलर्सचं भारतीय फलंदाजांना आव्हान

स्टीव्हन स्मिथने भारतीय बोलर्सला डिवचल्यानंतर आता संघात नुकतीच निवड झालेल्या युवा बोलर्स मिशेल स्वेप्सनने (Mitchell Swepson) भारतीय फलंदाजांना आव्हान दिलं आहे.

India tour Australia | ऑस्ट्रेलियन संघात निवड होताच युवा बोलर्सचं भारतीय फलंदाजांना आव्हान
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 12:07 PM

सिडनी :  टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी  (India Tour Australia) सिडनीमध्ये पोहचली आहे. अवघ्या काही दिवसांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यानंतर टीम इंडिया अनुक्रमे टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. स्टीव्हन स्मिथने भारतीय बोलर्सला डिवचल्यानंतर आता ऑस्ट्रेलियन संघात नुकतीच निवड झालेल्या युवा बोलर्स मिशेल स्वेप्सनने (Mitchell Swepson) भारतीय फलंदाजांना आव्हान दिलं आहे. (uncapped mitchell swepson challenge team india batting despite saying him world class)

“भारतीय टीम अव्वल दर्जाची आहे. भारतीय टीममधले खेळाडू जागकित कीर्तीचे आहेत. मला जर भारतीय संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली तर मी माझं अव्वल प्रदर्शन करेल. मी भारताविरुद्ध खेळण्यास तसंच भारतीय बॅट्समनला बोलिंग टाकण्यास सज्ज आहे”, असं म्हणत युवा बोलर्स मिशेल स्वेप्सनने भारतीय फलंदाजांना आव्हान दिलं आहे.

जगातला सर्वोत्कृष्ट बॅट्समन विराट कोहलीला बोलिंग करण्याच्या प्रश्नावर मिशेल स्वेप्सनने खास उत्तर दिलं. “जगातल्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांसमोर माझी टेस्ट करायला मला नक्कीच आवडेल. विराट अनुभवी बॅट्समन आहे. त्याच्याविरुद्ध बोलिंग करताना मला मजा येईल”.

दुसरीकडे मिशेल स्वेप्सनची अंतिम 11 खेळाडूंमध्ये वर्णी लागेल की नाही, हे सांगता येत नाही. कारण नॅथन लायनसारखा अनुभवी गोलंदाज ऑस्ट्रेलियाकडे आहे. शेफील्ड शिल्डमध्ये मिशेल स्वेप्सनने चमकदार कामिगरी केली होती. बांगलादेशविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. मात्र कोरोनामुळे ती मालिका स्थगित करण्यात आली होती.

स्टीव्ह स्मिथने टीम इंडियाच्या गोलंदाजांना डिवचलं

टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (INDIA TOUR AUSTRALIA) यूएईहून ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. रवाना झाल्याबरोबर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथने (Steve Smith) भारतीय गोलंदाजांना आव्हान दिलं आहे. माझ्याविरोधात जर शॉर्टपीच बॉल टाकण्याचा प्लॅन करणार असाल तर मला त्याची भीती नाही पण तुम्ही करत असलेल्या प्लॅनचा काहीही फायदा होणार नाही, असं म्हणत स्टीव्ह स्मिथने भारतीय बोलर्सला डिवचलं आहे. ( Aus Steve Smith Challenge india pacers)

“माझ्या जीवनात मी एवढ्या शॉर्टपीच बॉलचा सामना केलाय की आता मला कसलीही चिंता वाटत नाही. भारतीय बोलर्स जर माझ्याविरोधात शॉर्टपीच बॉल टाकून मला आऊट करण्याचा प्रयत्न करणार असतील तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. उलट भारतीय संघाला त्याचा तोटाच होईल”, असं स्टीव्ह स्मिथने म्हटलंय.

ऑस्ट्रेलिया टेस्ट टीम : टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स (उप कर्णधार), सीन एबोट, जो बर्न्स, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, नॅथन लियोन, मायकल नासिर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, मॅथ्यू वेड आणि डेव्हिड वार्नर .

भारतीय कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अ‌ॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अ‌ॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

(uncapped mitchell swepson challenge team india batting despite saying him world class)

संबंधित बातम्या

INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.