IND Vs AUS : कर्णधार विराट कोहलीला विश्वविक्रमाची संधी
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 डिसेंबरपासून कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे.
अॅडिलेड : एकदिवसीय आणि टी 20 मालिकेनंतर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात (india vs australia 2020) कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ही कसोटी मालिका एकूण 4 सामन्यांची असणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना अॅडिलेड येथे खेळण्यात येणार आहे. या सामन्यात विराट कोहलीला कर्णधार म्हणून (Virat Kohli) विश्वविक्रम करण्याची संधी आहे. ind vs aus virat kohli has the opportunity to break ricky ponting record for most international centuries as a captain
रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडीत काढण्याची संधी
विराटला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. रिकी पॉन्टिंगच्या नावे कर्णधार म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं लगावण्याचा विक्रमाची नोंद आहे. हाच विक्रम विराटला मोडण्याची संधी आहे. पॉन्टिंग आणि विराट या दोघांनी कर्णधार म्हणून 41 शतकं लगावली आहे. त्यामुळे विराटला 1 शतक लगावताच पॉन्टिंगचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.
विराटने एकूण 187 सामन्यात नेतृत्व करताना 41 शतकं लगावली आहेत. तर पॉन्टिंगने 324 सामन्यात ऑस्ट्रेलियाचे कर्णधाराची भूमिका बजावताना 41 शतंक पूर्ण केली आहेत. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रेम स्वान तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्मिथने 286 सामन्यात कर्णधार म्हणून 31 शतकं झळकावले आहेत.
तर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथचा चौथा क्रमांक लागतो. स्टीव्हने कर्णधार म्हणून 20 शतकं लगावली आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा मायकल क्लार्क आणि वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा प्रत्येकी 19 शतकांसह संयुक्तरित्या पाचव्या क्रमांकावर आहेत.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या यादीत 100 शतकांसह सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. तर 71 शतकांसह रिकी पॉन्टिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली 70 शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे विराटने आणखी एक शतक केल्यास पॉन्टिंगच्या शतकांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. त्यामुळे पहिल्या ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत विराटच्या कामगिरीवर सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन
असा आहे कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज.
संबंधित बातम्या :
IND Vs AUS | पहिल्या कसोटीत विकेटकीपर साहा की पंत? दिग्ग्जाची ‘या’ खेळाडूला पसंती
ind vs aus virat kohli has the opportunity to break ricky ponting record for most international centuries as a captain