Virat Kohli | ‘बापमाणूस’ मायदेशी, मराठमोळ्या रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम तीन कसोटी सामन्यांचं नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे देऊन भारतीय कर्णधार विराट कोहली मायदेशासाठी रवाना झाला आहे.

Virat Kohli | 'बापमाणूस' मायदेशी, मराठमोळ्या रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 10:00 AM

मुंबईऑस्ट्रेलियाविरुद्धच्या  (Ind vs Aus)अंतिम तीन कसोटी सामन्यांचं नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे (Ajinkya Rahane) देऊन भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)  मायदेशासाठी रवाना झाला आहे. पालकत्व रजा (Virat Parental Leave ) टाकून तो भारतासाठी रवाना झाला आहे. रवाना होण्यापूर्वी त्याने टीममधल्या सर्व खेळाडूंशी चर्चा केली आणि उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाला हौसला बुलंद केला. (Ind Vs Aus Virat kohli left For india Paternity Leave)

विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) गर्भवती आहे. जानेवारी महिन्यात अनुष्का शर्मा आणि विराट आई-बाबा होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विराटने बीसीसीआयकडे पॅटनिर्टी लिव्हसाठी अर्ज केला होता. बीसीसीआयने विराटची रजा मंजूर केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर विराट कोहली आता मायदेशासाठी रवाना झाला आहे.

विरानुष्काचं इटलीत 2017 मध्ये लग्न

विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी 2017 मध्ये विवाबबद्ध झाले. विराट आणि अनुष्का एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या निमित्ताने पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. त्या जाहिरातीवेळी विराट थोडा अस्वस्थ होता. अभिनयाबाबत विराटला तितकीशी माहिती नसल्यामुळे विराट ‘दबावात’ होता. मात्र या जाहिरातीनंतर विराट आणि अनुष्का यांचा एकमेकांशी संवाद वाढला. पुढे त्यांची मैत्री आणि प्रेम झालं. मग मीडियात त्यांच्या अफेयरची चर्चा जोर धरु लागली. त्यानंतर दोघांनी 2017 मध्ये लगीनगाठ बांधली.

अजिंक्य रहाणे करणार भारतीय संघाचं नेतृत्व

कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुढील तीन कसोटी सामन्यांचं अजिंक्य प्रतिनिधित्व करेल. पहिल्या कसोटीतील ऐतिहासिक पराभव विसरुन उर्वरित कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंकडून सर्वोत्तम खेळ करुन घेण्याचं आव्हान अजिंक्यसमोर असणार आहे.

विराटची कॉपी करु नकोस, हरभजनचा रहाणेला सल्ला

अजिंक्य खूप शांत आणि समजूतदार आहे. तो विराटपेक्षा खूप वेगळा आहे. रहाणेने त्याच्या व्यक्तीमत्वात बदल करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. अजिंक्यला कदाचित असं वाटू शकतं की, आपणही विराटप्रमाणेच संघाचं नेतृत्व करायला हवं. परंतु मला असं वाटतं की त्याची बिलकूल गरज नाही. रहाणे जसा आहे त्याप्रमाणेच त्याने संघाचं नेतृत्व करायला हवं. त्याने त्याच्या पद्धतीने संघाकडून सर्वोत्तम खेळ करुन घ्यावा.

संबंधित बातम्या

IND vs AUS | विराटची कॉपी करु नकोस; हरभजनचा अजिंक्य रहाणेला सल्ला

India Tour of Australia | कसोटी मालिकेदरम्यान या कारणामुळे कर्णधार कोहली मायदेशी परतणार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.