चेतेश्वर पुजाराचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंता वाढवणारा, माजी गोलंदाजाचा तिसऱ्या मॅचपूर्वी थेट इशारा

टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खाननं मेलबर्न कसोटीमधील भारताची कमजोर बाजू मांडलीय. Zaheer Khan Pujara Struggle

चेतेश्वर पुजाराचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंता वाढवणारा, माजी गोलंदाजाचा तिसऱ्या मॅचपूर्वी थेट इशारा
चेतेश्वर पुजाराचा फॉर्म चिंतेची बाब ठरतेय
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 12:12 PM

मुंबई: भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia vs India)  दुसऱ्या कसोटीत 8 विकेटने विजय मिळवून मालिकेत जोरदार कमबॅक केलं आहे. मात्र, भारताचा माजी गोलंदाज झहीर खाननं भारतीय टीमला इशारा दिला आहे. मेलबर्न कसोटीत विजय मिळवल्यानं भारतीय संघातील उणिवांवर पडदा पडला. जर, त्या गोष्टी भरुन काढल्या नाही तर सिडनी कसोटीत त्या भारतीय संघाला महागात पडू शकतात, असं झहीर खान म्हणाला. (Zaheer Khan reveals Team India  weak point Pujara struggle ahead of Sydney test)

चेतेश्वर पुजाराचा फॉर्म भारताची कमजोरी

टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खाननं मेलबर्न कसोटीमधील भारताची कमजोर बाजू मांडली आहे. त्या कमजोरीवर मार्ग काढावा लागेल, असं झहीर खान म्हणाला. झहीर खाननं भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजाराचा फॉर्म भारताची कमजोरी असल्याचं म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराचा फॉर्म भारतासाठी चिंतेचे कारण बनला आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये चेतेश्वर पुजारा ऑसी गोलंदाज पॅट कमिन्सच्या विरोधात अडखळताना दिसला.

चेतेश्वर पुजाराला पॅट कमिन्सच्या विरोधात संघर्ष करावा लागतोय ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे, असं झहीर खान म्हणाला. पुजारानं मागील दौऱ्यावर असताना कसोटी मालिकेत सर्वाधिक 521 धावा केल्या होत्या. मात्र, सध्या सुरु असलेल्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातील चार डावांपैकी तीनवेळा पुजाराला बाद पॅट कमिन्सनं बाद केले. पुजारा या मालिकेत एकही अर्धशतक करु शकलेला नाही.

पुजारा कमबॅक करेल

चेतेश्वर पुजाराचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेची बाब असली तरी तो लवकरच कमबॅक करेल, असा विश्वास झहिर खानने व्यक्त केला आहे. पुजाराला त्याच्या फलंदाजीच्या शैलीत बदल करावा लागेल, असं झहीर खान म्हणाला.

उमेश यादव भारतात परतला

दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झालेला भारताचा गोलंदाज उमेश यादव भारतात परतला आहे. उमेश यादवला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागले होते. उमेश यादव बंगळुरुमध्ये उपचार घेणार आहे. उमेश यादवनं सामन्यातील 8 व्या ओव्हरमधील तिसरा चेंडू टाकला. यानंतर उमेश रनअपमध्ये लगंडताना दिसला. उमेशला हॅमस्ट्रिंग इंज्युरीचा त्रास जाणवला. यामुळे तडक टीम इंडियाचे फिजीओ मैदानात आले. या दुखापतीमुळे उमेशला मैदानाबाहेर जावे लागले. यामुळे ही उर्वरित ओव्हर मोहम्मद सिराजने पूर्ण केली.

संबंधित बातम्या:

AUS vs IND, 2nd Test | रहाणे बडे दिलवाला ! अजिंक्य रन आऊट झाल्यानंतर मैदानात काय झालं? वाचा सविस्तर

Ravindra Jadeja | बॅटिंगमध्ये कमाल, बोलिंगमध्ये धमाल, रवींद्र जाडेजाची जबरदस्त कामगिरी

(Zaheer Khan reveals Team India  weak point Pujara struggle ahead of Sydney test)

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.