IND vs BAN: कसोटी सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या संपूर्ण माहिती
या युवा खेळाडूंना मिळणार संधी, कसोटी सामन्याची वेळ बदलली
मुंबई : टीम इंडिया (IND) आणि बांगलादेश (BAN) यांच्यातील एकदिवसीय मालिका नुकतीचं संपली. बांगलादेश टीमच्या खेळाडूंनी चांगली खेळी केल्यामुळे त्यांना मालिका जिंकली. परवापासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन कसोटी मालिका होणार आहे. टीम इंडियाचे अनेक खेळाडू जखमी झाले असल्यामुळे युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma)जखमी असल्यामुळे टीम इंडियाचं नेतृत्व केएल राहूलकडे देण्यात आलं आहे. टीम इंडियामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे.
टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्या अकरा वाजता कसोटी मालिका सुरु होणार होती. परंतु कसोटी सामन्याची वेळी बदलण्यात आली असून नऊ वाजता सामना सुरु होणार असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. दोन्ही कसोटी सामन्यासाठी एकच टायमिंग असेल असंही सांगितलं आहे.
प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीकडे बीसीसीआयचे लक्ष आहे. कारण पुढच्यावर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियामध्ये चांगल्या खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे.
पहिला कसोटी सामना टीम इंडियाच्या चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरती पाहायला मिळणार आहे.
पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये या खेळाडूंना संधी
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि नवदीप सैनी.