IND vs BAN: या अनुभवी खेळाडूला शेन वॉर्नचा रेकॉर्ड तोडण्याची संधी, इतक्या विकेटची गरज
हा खेळाडू शेन वार्नचा रेकॉर्ड तोडू शकेल ?
मुंबई : टीम इंडिया (IND) आणि बांगलादेश (BAN) यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. साडेअकरा वाजता टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात दुसरी मॅच सुरु होईल. ही मॅच टीम इंडियाच्या चाहत्यांना सोनी लाईव्ह (Sony Live)या चॅनेलवरती पाहायला मिळणार आहे. आजच्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी करो या मरो अशी स्थिती असणार आहे. कारण टीम इंडियाचा बांगलादेशने पहिल्या सामन्यात पराभव केला आहे.त्यामुळे आजचा सामना टीम इंडियाला जिंकावा लागणार आहे.
बांगलादेश टीमचा स्टार गोलंदाज शाकिब अल हसन हा शेनवार्नच्या रेकॉर्ड जवळ आला आहे. टीम इंडियाविरुद्ध झालेल्या पहिल्या मॅचमध्ये त्याने पाच विकेट घेतल्यामुळे तो चर्चेत आला होता.
शाकिब अल हसन याने आतापर्यंत बांगलादेश टीमकडून 222 आंतरराष्ट्रीय मॅचेस खेळल्या आहेत. त्यामध्ये त्याने 290 विकेट घेतल्या आहेत.विशेष म्हणजे त्याने आतापर्यंत चारवेळा पाच विकेट घेतल्या आहेत. आजच्या मॅचमध्ये शाकिब अल हसन याने फक्त तीन विकेट घेतल्यानंतर वॉर्नशी त्याची बरोबरी होणार आहे. विशेष म्हणजे आजच्या मॅचमध्ये शाकिब अल हसन याने चार विकेट घेतल्या तर तो शेनवॉर्नचा रेकॉर्ड तोडणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज शेन वॉर्नने 194 आंतरराष्ट्रीय सामन्यात 293 विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे वॉर्नने एकवेळा पाच विकेट घेतल्या आहेत. तर 12 वेळा 4 विकेट घेतल्या आहेत.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन, उमरान मलिक.
बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
लिटन दास (कर्णधार, यष्टिरक्षक), नजमुल हुसेन शांती, यासिर अली, आसिफ हुसैन, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, शकीब अल हसन, मुस्तफिजुर रहमान, नमस अहमद, इबादत हुसेन.