Ind vs Eng : एका रन्सने शतक हुकलं, आकाशाकडे पाहत दिवंगत पित्याला ‘सॉरी’ म्हटलं, पुण्यात बेन स्टोक्सचा झंझावात!

अवघ्या एका धावेने शतक हुकल्यानंतर बेन स्टोक्स भावूक झाला होता. त्याने आकाशाकडे पाहत आपल्या दिवंगत पित्याला सॉरी म्हटलं. पाठीमागच्या वर्षी त्याच्या वडिलांचं निधन झालंय. | Ben Stokes Says Sorry To Late Father After Miss Hundred

Ind vs Eng : एका रन्सने शतक हुकलं, आकाशाकडे पाहत दिवंगत पित्याला 'सॉरी' म्हटलं, पुण्यात बेन स्टोक्सचा झंझावात!
Ben Stokes
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 6:46 AM

पुणे भारत विरुद्ध इंग्लंड (India Vs England) यांच्यात पुण्यात (MCA Pune) दुसरा एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यात बेन स्टोक्स (Ben Stokes) नावाचं वादळ पाहायला मिळालं. या वादळात टीम इंडिया उद्धवस्त झाली. प्रथम बॅटिंग करताना टीम इंडियाने 336 धावांचा डोंगर रचला होता. परंतु स्टोक्सच्या वादळापुढे भारताच्या 336धावाही फिक्या पडल्या. स्टोक्सने 52 चेंडूत 99 धावांची बहारदार खेळी केली. या खेळीत त्याने गगनचुंबी 10 षटकार खेचले. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शतकासाठी एका धावेची गरज असताना तो भुवीच्या (Bhuvneshwar Kumar) बोलिंगवर विकेटकीपर रिषभ पंतच्या (Rishabh Pant) हाती कॅच देऊन आऊट झाला. अवघ्या एका धावेने शतक हुकल्यानंतर बेन स्टोक्स भावूक झाला होता. त्याने आकाशाकडे पाहत आपल्या दिवंगत पित्याला सॉरी म्हटलं. पाठीमागच्या वर्षी त्याच्या वडिलांचं निधन झालंय. (Ind Vs Eng 2nd ODI Ben Stokes Says Sorry To Late Father After Miss Hundred)

प्रथम बॅटिंग करताना भारताने मोठी धावसंख्या उभारली. मात्र या धावसंख्येचा इंग्लंडच्या फलंदाजांना कोणताही फरक पडला नाही. इंग्लंडच्या सलामी फलंदाजांनी अतिशय सावध सुरुवात केली. मात्र सुरुवातीच्या ओव्हर्स गेल्यानंतर आणि जम बसल्यानंतर त्यांनी भारतीय बोलर्सचा समाचार घ्यायला सुरुवात केली. भारताला काही केल्या विकेट मिळत नव्हती. अखेर रोहित शर्माच्या शानदार फिल्डिंगने सलामीवीर जेसन रॉयला तंबूत जायला लागलं.

मैदानात बेन स्टोक्सचं वादळ

तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी बेन स्टोक्स मैदानात उतरला. त्याने आपलं अर्धशतक 40 चेंडूमध्ये पूर्ण केलं. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 4 षटकार निघाले परंतु अर्धशतकानंतर स्टोक्सने गिअर बदलला. टॉप गिअरमध्ये त्याची गाडी निघाली. नंतरच्या 11 बॉलमध्ये त्याने 49 धावा झोडल्या. त्याने भारतीय फिरकीपटू क्रुणाल पांड्या आणि कुलदीप यादवचा पार चोळामोळा करुन टाकला. क्रुणालच्या तर एका ओव्हर्समध्ये त्याने 28 धावा फटकावल्या. बेन स्टोक्सने जॉनी बेअरस्टोच्या साथीने केवळ 114 बॉलमध्ये 175 रन्सची अफलातून पार्टनरशीप रचली.

केवळ एका धावेने शतक हुकलं…

बेन स्टोक्सला शतकासाठी एका धावेची गरज होती. आक्रमक अंदाजात स्टोक्स शतक साजरं करणार, असं सगळ्यांनाच वाटत होतं. भुवी बोलिंग मार्कवर होता. भुवीने स्टोक्सला बाऊन्सर बॉल टाकला. एक धाव घेण्याच्या नादात बॉलने त्याची बॅटची कडा घेतली होती. रिषभ पंतने त्याचं काम न चुकता पूर्ण केलं. पंत आणि भुवीने हलकीशी अपली केली. पंचांनीही क्षणाचाही विलंब न करता आऊट निर्णय दिला. अशा प्रकारे बेन स्टोक्सच्या खेळीचा असा दुर्दैवी शेवट झाला. शतक अवघ्या एका धावेने हुकलं.

आकाशाकडे इशारा करत सॉरी बाबा…

अवघ्या एका धावेने शतक हुकल्यानंतर बेन स्टोक्स भावूक झाला होता. त्याने आकाशाकडे पाहत आपल्या दिवंगत पित्याला सॉरी म्हटलं. अनेक दिवसांपासून ते आजारी होते. पाठीमागच्या वर्षी त्याच्या वडिलांचं निधन झालंय.

(Ind Vs Eng 2nd ODI Ben Stokes Says Sorry To Late Father After Miss Hundred)

हे ही वाचा :

IND vs ENG 2nd ODI Live Score : स्टोक्सचा झंझावात, इंग्लंडचा भारतावर 6 विकेट्सने विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरी

अजय जाडेजाचं मोठं विधान, भलेही कोहली कॅप्टन, मात्र रवी शास्त्रीच टीम चालवतात!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.