Ind Vs Eng : भारतीय बोलर्सची पिसं काढली, गगनचुंबी 10 षटकार, पुण्यात बेन स्टोक्सचा ‘हा’ जबरा रेकॉर्ड!

स्टोक्सचं शतक एका धावेने जरुर हुकलं पण त्याने भारतीय फलंदाजांवर जे आक्रमण केलं तसं आक्रमक गेल्या काही वर्षांत बहुदा कुणी केलं नव्हतं. | ben Stokes Record Most sixes in an ODI match without scoring a century

Ind Vs Eng : भारतीय बोलर्सची पिसं काढली, गगनचुंबी 10 षटकार, पुण्यात बेन स्टोक्सचा 'हा' जबरा रेकॉर्ड!
Ben Stokes
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 7:28 AM

पुणेभारत विरुद्ध इंग्लंड (India vs England 2nd ODI) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रन्सचा पाऊस पडला. पहिल्यांदा के.एल.राहुल (KL Rahul), विराट कोहली (Virat Kohli) आणि नंतर रिषभ पंत (Rishabh Pant) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी तडाखेबंद बॅटिंग करत 336 धावांचा विशाल डोंगर उभा केला. इंग्लंडच्या बॅट्समनने देखील भारतीय फलंदाजांचा कित्ता गिरवला. जेसन रॉय (Jayson Roy), जॉनी बेअरस्टो (jonny bairstow), बेन स्टोक्स (Ben Stokes) यांनी आतिषी खेळी खेळल्या. परंतु स्टोक्सने जे केलं ते कुणालाही जमलं नाही. स्टोक्सचं शतक एका धावेने जरुर हुकलं पण त्याने भारतीय फलंदाजांवर जे आक्रमण केलं तसं आक्रमक गेल्या काही वर्षांत बहुदा कुणी केलं नव्हतं. त्याचमुळे स्टोक्सच्या नावावर पुण्यात खास विक्रम नोंदवला गेला आहे. वन डे क्रिकेटमध्ये शतक न होऊनही सगळ्यात जास्त सिक्सर ठोकणारा बॅट्समन म्हणून त्याच्या नावावर विक्रम नोंदला गेला आहे. (Ind vs Eng ben Stokes Record Most sixes in an ODI match without scoring a century)

भारतीय बोलर्सला धू धू धुतलं, केवळ 11 चेंडूत 49 धावा

स्टोक्सच्या बहारदार खेळीचं वैशिष्ट होतं त्याने अर्धशतकानंतर धारण केलेलं आक्रमक रुप… त्याने 40 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. परंतु नंतरच्या 49 धावा केवळ 11 चेंडूंमध्ये ठोकल्या. या 11 चेंडूंपैकी त्याने 6 चेंडू मैदानाबाहेर फेकले. स्टोक्स शतकही याच अंदाजात साजरं करेन असं वाटत असताना भुवीने त्याला रिषभ पंतकडे कॅच द्यायला भाग पडलं. 52 चेंडूमध्ये 99 धावा करुन तो बाद झाला.

पुण्यात षटकारांचा पाऊस, स्टोक्सच्या नावे खास विक्रम

स्टोक्सने 52 चेंडूत 10 षटकारांच्या मदतीने 99 धावा केल्या. स्टोक्सने पुण्याच्या गहुंजे मैदानावर षटकारांचा पाऊस पाडला. स्टोक्सने याचसोबत एक खास रेकॉर्ड आपल्या नावे केला. वन डे क्रिकेटमध्ये शतक न होऊनही सगळ्यात जास्त सिक्सर ठोकणारा बॅट्समन म्हणून त्याच्या नावावर विक्रम नोंदला गेला आहे.

दुसऱ्या क्रमाकांवर प्रसन्ना तर तिसऱ्या क्रमाकांवर ख्रिस गेल

यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा सीकुगे प्रसन्ना आहे. त्याने 2016 मध्ये आयर्लंडविरुद्ध खेळताना 95 रन्सच्या खेळीत 9 षटकारांचा पाऊस पाडला होता. तर तिसऱ्या नंबरला सिक्सर किंग ख्रिस गेल आहे. इंग्लंडविरुद्ध खेळताना त्याने 2019 मध्ये 77 रन्सच्या खेळीत 9 षटकार लगावले होते.

आकाशाकडे इशारा करत सॉरी बाबा…

अवघ्या एका धावेने शतक हुकल्यानंतर बेन स्टोक्स भावूक झाला होता. त्याने आकाशाकडे पाहत आपल्या दिवंगत पित्याला सॉरी म्हटलं. अनेक दिवसांपासून ते आजारी होते. पाठीमागच्या वर्षी त्याच्या वडिलांचं निधन झालंय.

(Ind vs Eng ben Stokes Record Most sixes in an ODI match without scoring a century)

हे ही वाचा :

Ind vs Eng : एका रन्सने शतक हुकलं, आकाशाकडे पाहत दिवंगत पित्याला ‘सॉरी’ म्हटलं, पुण्यात बेन स्टोक्सचा झंझावात!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.