Ind vs Eng : बेन स्टोक्स मॅचअगोदर ‘लेडीज परफ्यूम’ लावतो, कारण वाचून हसू आवरणार नाही!

मी प्रत्येक मॅचअगोदर लेडीज परफ्यूम लावतो, असं गुपीत बेन स्टोक्सने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. (ben Stokes used ladies perfume)

Ind vs Eng : बेन स्टोक्स मॅचअगोदर 'लेडीज परफ्यूम' लावतो, कारण वाचून हसू आवरणार नाही!
ben Stokes
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 2:41 PM

पुणे : इंग्लंडचा विस्फोटक अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) आपल्या क्लासिक आणि आक्रमक खेळीसाठी ओखळला जातो. भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केवळ 52 चेंडूत 99 धावा ठोकून जागतिक क्रिकेटमधला तो सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू का आहे, हे त्याने दाखवून दिलं. त्याच्या खेळामुळे तो चर्चेत असतोच पण त्याच्या लाईफस्टाईमुळे देखील तो चर्चेत असतो. ‘मी प्रत्येक मॅचअगोदर लेडीज परफ्यूम लावतो’, असं गुपीत त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. (Ind vs Eng ben Stokes used ladies perfume before Match)

स्टोक्सने सांगितली मजेदार गोष्ट

बेन स्टोक्सने लेडीज डीओचा वापराबद्दल अतिशय मजेदार कारण सांगितलं. स्टोक्सने ‘रेडिओ स्टेशन टॉक स्पोर्ट्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, लेडीज डीओ पुरुषांतुलनेत अधिक सुगंधी देतात. म्हणून मला ते वापयारला आवडतात. प्रत्येक मॅच सुरु होण्याअगोदर मी लेडीज डीओ वापरतो.

कोणता लेडीज डीओ वापरतो?, या प्रश्नावरही स्टोक्सने उत्तर दिलं. अनारच्या सुगंधाचा डीओ मला आवडतो आणि तोच मी वापरतो, असं उत्तर त्याने दिलं.

पुढे बोलताना त्याने आणखी एक सिक्रेट सांगितलं. फक्त मीच एकटा लेडीज डीओ वापरतो असं नाही तर आमची संपूर्ण इंग्लिश टीम लेडीज डीओ वापरते, असं त्याने सांगितलं.

स्टोक्सची दुसऱ्या वनजेत वादळी 99 धावांची खेळी

बेन स्टोक्सने भारताविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार 99 धावांची खेळी केली. केवळ 52 चेंडूत त्याने 99 धावा फटकावताना गगनचुंबी 10 षटकार लगावले. त्याच्या खेळीमुळे इंग्लंडने भारताने दिलेलं 337 धावांचं आव्हान 44 व्या ओव्हर्समध्ये पूर्ण केलं.

त्याचं शतक केवळ एका धावेने हुकलं. भुवनेश्वर कुमारने विकेट कीपर रिषभ पंतकडे झेल द्यायला भाग पाडलं. शतक हुकल्यानंतर स्टोक्स काहीसा निराश झालेला पाहायला मिळाला. परंतु तोपर्यंत त्याने त्याचं काम फत्ते केलं होतं. जॉनी बेअरस्टोने देखील 124 धावांची शानदार खेळली. त्याचमुळे इंग्लंडने भारताला दुसऱ्या वन डेत 6 विकेट्स पराभूत केलं.

स्टोक्सच्या आजच्या कामगिरीकडे साऱ्यांचं लक्ष

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघाला आजची मॅच जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी केल्याने आजचा निर्णायक सामना आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झंझावाती खेळी करुन टीम इंडियाच्या विजयाचा घास स्टोक्सने हिरावला. आजच्या निर्णायक सामन्यातल्या स्टोक्सच्या कामगिरीकडे साऱ्यांच लक्ष आहे.

(Ind vs Eng ben Stokes used ladies perfume before Match)

हे ही वाचा :

धोनी नाही तर कुलदीपची जादू काही चालेना, आकडेवारीच सगळं सांगते…

हिटमॅन रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध टी ट्वेन्टीत केला होता रेकॉर्ड, किवी फलंजादाने महिनाभरही टिकू दिला नाही !

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.