विराटला हटवा, अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद द्या, पहिल्या कसोटी पराभवानंतर मागणीने जोर धरला
पहिल्या कसोटीत झालेल्या पराभवानंतर विराट कोहलीकडून कर्णधारपद काढून घेऊन ते अजिंक्य रहाणेकडे सोपवण्याची मागणी जोर धरु लागली आहे. | Give Captaincy to Ajinkya Rahane Demand After Defeat in Chennai
मुंबई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (Ind Vs Eng) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा 227 धावांनी धुव्वा उडवला. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या (virat Kohli) नेतृत्वाखाली भारतीय संघाचा चेन्नईचा एम.ए. चिदंबरम स्टेडिअमवर लाजीरवाणा पराभव झाला. त्यानंतर आता विराट कोहलीचं कर्णधारपद काढून घेण्याची मागणी ट्विटरवर काही क्रीडा चाहते करु लागलेले आहेत. विराटचं कर्णधारपद काढून घेऊन अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. (Ind Vs Eng Give Captaincy to Ajinkya Rahane Demand After Defeat in Chennai)
भारतीय कर्णधार विराट कोहलीने मोठ्या गॅपनंतर संघात पुनरागमन केलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली कसोटी खेळल्यानंतर विराट पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला होता. त्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध संघात पुनरागमन केलं. मात्र पुनरागमनानंतरच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला मोठा पराभव स्वीकारावा लागला.
विराटचं कर्णधारपद काढून घेऊन अजिंक्य रहाणेला कर्णधार करा
इंग्लंविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत भारतीय संघाचा 227 धावांनी पराभव झाला. साहजिकच क्रिकेट चाहत्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्याची आठवण होऊन अजिंक्य रहाणेने अगदी बिकट परिस्थितीमध्ये भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर चाहत्यांनी विराटचं कर्णधारपद काढून घेऊन ते अजिंक्य रहाणेकजडे देण्याची मागणी केली आहे.
Virat Kohli such a Impactful player. Without him It took India 3 tests in Australia to go on top and create history but he joined and put us back to be a losing side in just one test. Incredible impact.
— EngiNerd. (@mainbhiengineer) February 9, 2021
Ajinkya Rahane beat Australia in Australia with net bowlers and T20 batsmen. Virat Kohli can’t beat England in India with his top bowlers and batsmen. This is getting ridiculous. Kohli’s Bangalore has finished last in IPL every time. Isn’t that proof he’s not captaincy material.
— Rakesh Thiyya (@ByRakeshSimha) February 7, 2021
@imVkohli : Another embarrassing defeat under your captaincy, first NZ, then Australia and now in India, if u have even an iota of self respect, renounce captaincy.@BCCI : We need Virat the bat not Virat the captain.#INDvsENG_2021 #Disappointment
— Mohit (@Mohit1717) February 9, 2021
#INDvsENG @ImRo45 @ajinkyarahane88 @imVkohli pic.twitter.com/BcvCtSLRKj
— Rahul Jâykãr (@RahulJykr1) February 9, 2021
अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद देण्याची मागणी का?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्याच ऐतिहासिक पराभव, संघाचा आधारस्तंभ विराट कोहलीची अनुपस्थिती, अनेक खेळाडूंची दुखापतींच्या कारणाने सिरीजमधून माघार… या सर्व पार्श्वभूमीसह टीम इंडियाचं नेतृत्त्व अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं. कांगारुंचा जबरदस्त फॉर्म आणि त्यांचं घरचंच मैदान यामुळे भारतीय टीम आधीच बॅकफूटवर होती. मात्र याच कठीण प्रसंगात अजिंक्य रहाणेने लीडर कसा असतो, याची झलक दाखवली.
रहाणेने आधी खेळाडूंना बळ दिलं, सांघिक भावना जोपासली. मग फलंदाजीत एक बाजू भक्कमपणे लावून धरली आणि लढत राहिला. रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडिया मजबुतीने लढली, त्यामुळेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली.
अजिंक्यने कठीण परिस्थितीत भारतीय संघाला विजय मिळवून दिला मग आता तर संघात सगळे दिग्गज खेळाडू आहेत. अनुभवी खेळाडूंचा संघात भरणा आहे, गोलंदाजांची धारही आहे, मग भारतीय भूमीवर भारतीय संघाचा पराभव का?, असा प्रश्न विचारत भारतीय संघाला विजय मिळवून न देऊ शकणाऱ्या विराटचं कर्णधारपद काढून घेवून ते अजिंक्यकडे सोपवण्याची मागणी काही क्रिकेट चाहते ट्विटरवर करु लागले आहेत.
(Ind Vs Eng Give Captaincy to Ajinkya Rahane Demand After Defeat in Chennai)
हे ही वाचा :
VIDEO : ‘ओए, मेनन! थेट पिचमध्येच धावतोय यार’, विराट कोहलीची अंपायरकडे तक्रार, व्हिडीओ व्हायरल