IND vs ENG: प्रेक्षकांकडून कोरोनाच्या नियमांची ऐशीतैशी; उर्वरित तीन ट्वेन्टी-20 सामन्यांना प्रेक्षकांना प्रवेशबंदी
या तीन सामन्यांची तिकीटे ज्या प्रेक्षकांनी खरेदी केली आहेत त्यांचे पैसे गुजरात क्रिकेट असोसिएशनकडून परत केले जातील. | IND vs ENG last 3 T-20 matches
मुंबई: देशातील कोरोना रुग्णांच्या (Coronaviurs) वाढत्या संख्येमुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील उर्वरित तीन ट्वेन्टी-20 (Ind vs Eng) सामन्यांसाठी प्रेक्षकांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील ट्वेन्टी-20 सामने प्रेक्षकांविनाच खेळवले जातील. (India vd England 2nd T2OI 3rd match)
या तीन सामन्यांची तिकीटे ज्या प्रेक्षकांनी खरेदी केली आहेत त्यांचे पैसे गुजरात क्रिकेट असोसिएशनकडून परत केले जातील. गुजरातमधील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आम्हाला 16 मार्च, 18 मार्च आणि 20 मार्चला होणारे सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय घ्यावा लागला, अशी माहिती गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने दिली.
प्रेक्षकांचे पैसे परत करणार
हे तीन सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय झाल्याने आता गुजरात क्रिकेट असोसिएशनला प्रेक्षकांचे पैसे परत करावे लागणार आहेत. त्यासाठी एक धोरण आखण्यात येणार आहे. तर या तीन सामन्यांचे पासेस मिळालेल्या प्रेक्षकांना मैदानात न येण्याची विनंती केली जाणार आहे. यापूर्वी मैदानात 50 टक्के प्रेक्षकांना बसण्याची मुभा देण्यात आली होती. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची प्रेक्षकक्षमता 1.32 लाख इतकी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्याला जवळपास 67 हजार प्रेक्षक उपस्थित होते. मात्र, यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.
प्रेक्षकांवर का घालावी लागली बंदी?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ट्वेन्टी-20 सामन्याला प्रेक्षकांची गर्दी झाल्याने अनेकजण सरकारवर टीका करत होते. या सामन्यात अनेक प्रेक्षकांकडून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसून आले. अनेक प्रेक्षकांनी मास्क परिधान केला नव्हता. तर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले होते. त्यामुळे गुजरात क्रिकेट असोसिएशनला नाईलाजाने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय घ्यावा लागला. गेल्या काही दिवसांत देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. रविवारी देशात 25320 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. ही तीन महिन्यांतील सर्वोच्च कोरोना रुग्णसंख्या आहे.
संबंधित बातम्या :
India vd England 2nd T2OI | शानदार विजयानंतरही टीम इंडियाला मोठा धक्का
32 चेंडूत 56 रन्स कशा ठोकल्या? नेमकी कशाची मदत झाली? इशान म्हणतो…
India vs England 2021, 2nd T20 | विराटचा दणका, इशानचा झंझावात, इंग्लंडवर 7 विकेट्सने मात, मालिकेत 1-1 ने बरोबरी
(India vd England 2nd T2OI 3rd match)