प्रसिद्ध कृष्णाने उधळले पाहुण्या इंग्लंडचे मनसुबे, पण त्याचा आयडॉल कोण?, त्याला कसा बोलर व्हायचंय?, वाचा त्याने काय सांगितलं…

पदार्पणाच्या सामन्यातच पाहुण्या इंग्लंडचे (ind Vs eng) मनसुबे उधळून भारताच्या विजयात बोलर प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh krishna) मोलाचा वाटा उचलला.

प्रसिद्ध कृष्णाने उधळले पाहुण्या इंग्लंडचे मनसुबे, पण त्याचा आयडॉल कोण?, त्याला कसा बोलर व्हायचंय?, वाचा त्याने काय सांगितलं...
prasidh Krishna
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 11:18 AM

पुणे : पदार्पणाच्या सामन्यातच पाहुण्या इंग्लंडचे (ind Vs eng) मनसुबे उधळून भारताच्या विजयात बोलर प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh krishna) मोलाचा वाटा उचलला. सामना संपल्यानंतर मॅचविनिंग फरफॉर्मन्सबद्दल बोलताना भागिदारी तोडणारा आणि हिट द डेक साठी (hit the deck) ओळख असणारा बोलर्स म्हणून मला नाव कमवायचं आहे, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध कृष्णाने दिली. (Ind Vs Eng prasidh krishna hit the deck Bowler)

प्रसिद्ध कृष्णाने 8.1 षटकांत 54 धावा देऊन चार बळी घेतले आणि भारतीय संघाला 66 धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. जेसन रॉय (46) आणि जॉनी बेअरस्टो (94) यांनी सुरुवातीला प्रसिद्ध कृष्णाला टार्गेट केलं. मात्र त्यानंतर कृष्णाने या दोघा फलंदाजांना आऊट करुन बदला घेतला.

काय म्हणाला कृष्णा…?

“मला चांगली सुरुवात मिळाली नाही. माझ्याविरोधात इंग्लंडच्या फलंदाजांनी सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला. पण मला माझ्यावर विश्वास होता. आम्ही ठराविक अंतराने इंग्लंडच्या विकेट्स घेत गेलो ज्याचा संघाला फायदा झाला. सुरुवाचीच्या तून ओव्हर्सनंतर मला समजलं की मी फलंदाजांना पुढे चेंडू टाकून खेळवू शकत नाही. मी बॅटपासून दूर चेंडू टाकू लागलो आणि मला रिझल्ट दिसले”

कृष्णाची इच्छा काय?

विजय हजारे ट्रॉफीमध्ये कृष्णाने सात सामन्यांत 24.5 च्या सरासरीने 14 गडी बाद केले. इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. मला आयपीएलची मदत मिळाली पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये हे पुनरागमन होणे जास्त महत्त्वाचे होते. मला संघाच्या गरजेनुसार भागीदारी मोडीत काढणारा ‘हिट डेक’ गोलंदाज म्हणून ओळखले जायला हवे, असं तो म्हणाला.

पदार्पणाच्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाची धमाकेदार कामगिरी

प्रसिद्ध कृष्णाने आपल्या पदार्पणातील सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. प्रसिद्धने इंग्लंडच्या 4 फलंदाजांना निर्णायक क्षणी आऊट केलं. प्रसिद्धने जेसन रॉय, बेन स्टोक्स, सॅम बिलिंग्स आणि टॉम करनला आऊट केलं.

भारताची डोकेदुखी ठरत असलेली सलामी भागीदारी फोडली, भारताला लय सापडली

विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या इंग्लंडची झोकात सुरुवात झाली होती. जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टोने 135 धावांची सलामी भागीदारी केली. ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होती. टीम इंडिया बॅक फुटवर होती. भारताला विकेटची गरज होती. अशा निर्णायक क्षणी प्रसिद्धने आपल्या गोलंदाजीने जेसन रॉयला सूर्यकुमार यादवच्या हाती कॅच आऊट केलं. यासह प्रसिद्धने पहिली विकेटही घेतली. तसेच ही जोडीही फोडली.

पुढे भारतीय संघाला विकेट्सची गरज असताना प्रसिद्ध कृष्णा धावून आला. मोक्याच्या क्षणी त्याने बेन स्टोक्स आणि सॅम बिलिंग्सला आऊट करत भारताचा विजय आणि सुखर केला.

हे ही वाचा :

India vs England 1st Odi | इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णा आणि कृणाल पंड्याची शानदार कामगिरी

विराटला अगोदरच अंदाज आला होता, कृष्णा ‘प्रसिद्ध’ होणार आणि झालंही तसंच…!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.