IND vs ENG: टीम इंडियासोबत धोका! अगोदर रिषभ पंतला ऑऊट दिलं, 4 रन्सही दिल्या नाहीत, फॅन्स संतापले

अंपायरच्या चुकीमुळं रिषभ पंतला चार धावांचा फटका बसला. Rishabh Pant

IND vs ENG: टीम इंडियासोबत धोका! अगोदर रिषभ पंतला ऑऊट दिलं, 4 रन्सही दिल्या नाहीत, फॅन्स संतापले
रिषभ पंत
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 6:18 PM

पुणे : के एल राहुलच्या (KL Rahul) तुफानी शतकानंतर रिषभ पंत (Rishabh Pant) आणि हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) वादळाने, टीम इंडियाने दुसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडसमोर 6 बाद 336 धावांचा डोंगर उभा केला आहे. टीम इंडियाचा बॅटसमन रिषभ पंत यानं 40 चेंडूत 77 धावा केल्या. या दरम्यानं अंपायरच्या चुकीमुळं रिषभ पंतला चार धावांचा फटका बसला. यावरुन सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India Vs England 2nd ODI) यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना पुण्यातील गहुंजे मैदानात खेळवण्यात येत आहे. ( Ind vs Eng Rishabh Pant drs decision lost four runs)

नक्की काय घडलं?

रिषभ पंतची वादळी खेळी सुरु होती. 40 व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर रिषभनं रिव्हर्स रॅप स्कूप शॉट लगावला. यावेळी त्याच्या बॅटची कड लागून चेंडू सीमापार गेला. इकडे इंग्लंडच्या खेळाडूंनी एलबीडब्ल्यूचं अपील केलं आणि अंपायर वीरेंद्र शर्मांनी बाद दिलं. रिषभ पंतला हा निर्णय खटकल्यानं त्यानं डीआरएस अपील केलं. डीआरएसमध्ये रिषभला नॉट आऊट ठरवण्यात आलं. मात्र, आयसीसीच्या नियमाप्रमाणं रिषभला मिळणाऱ्या चार धावा देखील गेल्या. यामुळे फॅन्सनी संताप व्यक्त केला.

पुण्यात रिषभचं वादळ

रिषभ पंतनं इंग्लंड विरोधात वादळी खेळी केली. त्यानं 28 चेंडूमध्येच अर्धशतक पूर्ण केले. यामध्ये त्यानं तीन चौकार आणि चार षटकार खेचले होते. रिषभ पंतला दोनवेळा बाद देण्यात आलं होतं. मात्र, दोन्ही निर्णय डीआरएसमध्ये बदलले. रिषभनं 40 चेडूंचा सामना करत सात षटकार आणि तीन चौकारांच्या साथीनं 77 धावा केल्या.

इंग्लंडचा फिल्डिंगचा निर्णय

इंग्लडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघाने प्रथम फलंदाजीला सुरुवात केली. भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा (25) आणि शिखर धवन (4) हे स्वस्तात बाद झाले. मात्र कर्णधार विराट कोहली 79 चेंडूत 66 धावा आणि के एल राहुल 114 चेंडूत 108 धावा ठोकून मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली. मग रिषभ पंतने अवघ्या 40 चेंडूत 77 धावा ठोकून वादळ उभं केलं. त्याला हार्दिक पंड्याने 16 चेंडूत 35 धावा करुन झंझावाती साथ दिली. पंतने 7 तर पंड्याने 4 षटकार ठोकून गहुंजे मैदान दणाणून सोडलं. दोघांनी मिळून 11 षटकार ठोकले. कृणाल पंड्या 12 धावांवर नाबाद राहिला.

संबंधित बातम्या

IND vs ENG 2nd ODI Live Score : पंत आणि पांड्याचं पुण्यात वादळ, दोघांचे 11 सिक्स, इंग्लंडसमोर 337 धावांचं लक्ष्य

राहुलचं शतक, पंत-पांड्याचं पुण्यात वादळ, दोघांचे 11 सिक्स, इंग्लंडसमोर 337 धावांचं लक्ष्य

( Ind vs Eng Rishabh Pant drs decision lost four runs)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.