शिखर धवनने सांगितला टीमबाहेर राहण्याचा अनुभव, म्हणतो, ‘पाणी घेऊन जाण्याचा माझा विचार होता पण…’
भारतीय संघाचा सलामी फलंदाज शिखर धवनने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यांत 98 धावांची करुन भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. | Shikhar Dhawan
पुणे : भारतीय संघाचा सलामी फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यांत (ind vs eng 1st ODI) 98 धावांची खेळी करुन भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. गेल्या काही दिवसांपासून शिखर फॉर्मसाठी झगडत होता. मात्र पुण्यातील एमसीए मैदानावर शिखरने पुन्हा एकदा जुन्या अंदाजात बॅटिंग करत गब्बर इनिंग खेळली. मॅचनंतर बोलताना त्याने संघाबाहेर असण्याचा अनुभव शेअर केला. ‘मी नेहमी सकारात्मक विचार करतो. मी जेव्हा मॅच खेळत नव्हतो तेव्हा टीम इंडियासाठी मी अधिक काय काम करु शकतो, असा माझा विचार सुरु असायचा. यामध्ये पाणी घेऊन जायचं आणि दमदार फरफॉर्मन्स देणाऱ्या खेळाडूंना पाणी पाजण्याविषयीचे माझ्या मनात विचार सुरु असायचे’, असं शिखर धवनने सांगितलं. (ind Vs Eng Shikhar Dhawan Says I was being A Good 12th Man Serving Water)
शिखरच्या 98 धावांच्या खेळीने भारताचा विजय सोपा झाला. बऱ्याच दिवसांनंतर शिखरने भारतीय एकदिवसीय संघात पुनरागमन केलं. सुरुवातीलाच शिखरने काही आक्रमक फटके खेळले. त्याने खेळलेले कव्हर ड्राईव्ह, पुल आणि स्वीपचे फटके तर पाहण्यासारखे होते. 90 धावांचा पल्ला क्रॉस झाल्यानंतर शिखर जरा अडखळताना दिसला. त्यापुढील धावा करताना तो संथ पद्धतीने खेळला. अशातच आक्रमक फटका खेळण्याच्या नादात तो 98 धावांवर बाद झाला.
संघाबाहेर असण्याचा काळ मेहनतीचा
संघाबाहेर असण्याचा काळ पूर्ण मेहनतीचा काळ असतो. जिम, रनिंग, नेट सेशन या काळात चांगल्या प्रकारे सुरु होतं. या सगळ्याचा मला फायदा झाला, असं शिखर म्हणाला. शतक हुकण्याच्या प्रश्नावर शिखर धवनने खास उत्तर दिलं. “साहजिकच थोडी निशारा तर होते पण मी असा व्यक्ती नाही की जास्त आनंद होतो किंवा जास्त दु:ख होतं. मी शतक ठोकण्याच्या घाईत नव्हतो. मी फक्त एक शॉट्स लावण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच नादात मी आऊट झालो. पण नेहमी नेक्स्ट टाईम असतं….”
चांगला 12 वा खेळाडू बनण्याचा माझा विचार…
जेव्हा मी मॅच खेळत नसेल तेव्हा मी टीमच्या कामाला कशा प्रकारे तचांगला न्याय देऊ शकेन, याचा विचार करत असतो. दरम्यानच्या काळात मी खूप चांगला 12 वा खेळाडू बनण्याचा विचार करत होतो. मैदानातील सहकाऱ्यांना पाणी घेऊन जाणं किंवा त्यांना पाणी पाजणं, असा विचार माझ्या डोक्यात सुरु असायचा. मात्र या काळात मी प्रचंड पॉझिटिव्ह राहिलो. मला जेव्हाही संधी मिळेल तेव्हा मी त्या संधीचं रुपांतर सोन्यात करेन. चांगले रन्स करेन. कालच्या मॅचमध्ये मी मिळालेल्या संधीचं सोनं केलं.
शिखर कसा आऊट झाला?
शिखरने 90 धावांचा टप्पा पार केला. त्यानंतर तो संथपणे खेळत होता. शिखर एक एक धाव काढत होता. त्याला धावांसाठी झगडावं लागत होतं. त्यामुळे शिखरवर दबाव निर्माण झाला होता. बेन स्टोक्स सामन्यातील 39 वी ओव्हर टाकायला आला. शिखर 98 धावांवर खेळत होता. धवनला अवघ्या 2 धावांची गरज होती. मात्र स्टोक्सच्या पहिल्याच चेंडूवर शिखरने कर्णधार इयोन मॉर्गनच्या दिशेने फटका मारला. मॉर्गनने कोणतीही चूक न करता कॅच घेतला. अशाप्रकारे धवन आऊट झाला. धवनने 106 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारासंह 98 धावांची खेळी केली.
(ind Vs Eng Shikhar Dhawan Says I was being A Good 12th Man Serving Water)
हे ही वाचा :
India vs England 2021, 1st odi | गब्बरचं शतक हुकलं, शिखर धवन नर्व्हस नाईंटीचा शिकार