पाकिस्तानपर्यंत पोहोचली ‘कृष्णा’ची ‘प्रसिद्धी’, शोएब अख्तर म्हणतो, ‘त्याची बोलिंग म्हणजे करिश्मा!’

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) भारताच्या प्रसिद्ध कृष्णाची (prasidh krishna) तोंडभरुन स्तुती केली आहे.

पाकिस्तानपर्यंत पोहोचली 'कृष्णा'ची 'प्रसिद्धी', शोएब अख्तर म्हणतो, 'त्याची बोलिंग म्हणजे करिश्मा!'
Prasidh krishna and Shoaib akhtar
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 2:56 PM

मुंबई :  पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) भारताच्या प्रसिद्ध कृष्णाची (prasidh krishna) तोंडभरुन स्तुती केली आहे. प्रसिद्ध कृष्णाची बोलिंग पाहून अख्तर थक्क झाला आहे. प्रसिद्ध कृष्णा बोलिंग म्हणजे करिश्मा आहे, असं म्हणत कृष्णाच्या बोलिंगची अख्तरने न थकता स्तुती केली आहे. (Ind vs Eng Shoaib Akhtar says prasidh krishna is karishma)

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यांत वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या प्रसिद्ध कृष्णाने 54 धावा देत 4 विकेट्स मिळवल्या. आतापर्यंतच्या भारतीय बोलर्सपैकी कृष्णाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. पहिल्या वनडे मध्ये त्याची बोलिंग यासाठीही खास राहिली कारण पहिल्या तीन ओव्हर्समध्ये त्याने 33 रन्स दिले आणि नंतर आपल्या बोलिंगचा करिश्मा दाखवत त्याने 4 विकेट्स मिळवल्या.

कृष्णा नाही, तो तर करिश्मा

पदार्पणाच्या सामन्यात कृष्णाची बोलिंग अख्तरला भावली. तो कृष्णा नाही तर करिश्मा आहे, अशी स्तुतीसुमने त्याने उधळली. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये मार खाऊनही त्याचा आत्मविश्वास ढळला नाही. त्याने पुनरागमन करत 4 विकेट्स मिळवल्या आणि भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

कृष्णामध्ये सगळं आहे जे एका गोलंदाजाकडे पाहिजे

पहिल्याच सामन्यात प्रसिद्ध कृष्णाने जी अप्रतिम गोलंदाजी केली ते पाहून मी खूश झालो. एका फास्टर्स बोलर्ससाठी जे जे हवं ते ते प्रसिद्धकडे सगळं आहे. त्यामुळे पहिल्या 3 ओव्हरमध्ये मार खाऊनही त्याने सामन्यात पुनरागमन करण्याची जिद्द ठेवली.

सिरीजमध्ये अशीच कामगिरी करण्याचा प्रसिद्धचा प्रयत्न

जशी कामगिरी पहिल्या वन डे मध्ये झाली तशीच कामगिरी उर्वरित दोन्ही वनडे मध्ये करण्याचा प्रयत्न प्रसिद्ध कृष्णा करेल. इंटरनॅनशल क्रिकेटमध्ये एन्ट्री तर धमाकेदार झाली. आता अशाच प्रदर्शनाची संघाला प्रसिद्धकडून अपेक्षा आहे.

पदार्पणाच्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाची धमाकेदार कामगिरी

प्रसिद्ध कृष्णाने आपल्या पदार्पणातील सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. प्रसिद्धने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 4 फलंदाजांना निर्णायक क्षणी आऊट केलं. प्रसिद्धने जेसन रॉय, बेन स्टोक्स, सॅम बिलिंग्स आणि टॉम करनला आऊट केलं.

भारताची डोकेदुखी ठरत असलेली सलामी भागीदारी फोडली, भारताला लय सापडली

विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या इंग्लंडची झोकात सुरुवात झाली होती. जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टोने 135 धावांची सलामी भागीदारी केली. ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होती. टीम इंडिया बॅक फुटवर होती. भारताला विकेटची गरज होती. अशा निर्णायक क्षणी प्रसिद्धने आपल्या गोलंदाजीने जेसन रॉयला सूर्यकुमार यादवच्या हाती कॅच आऊट केलं. यासह प्रसिद्धने पहिली विकेटही घेतली. तसेच ही जोडीही फोडली.

पुढे भारतीय संघाला विकेट्सची गरज असताना प्रसिद्ध कृष्णा धावून आला. मोक्याच्या क्षणी त्याने बेन स्टोक्स आणि सॅम बिलिंग्सला आऊट करत भारताचा विजय आणि सुखर केला.

(Ind vs Eng Shoaib Akhtar says prasidh krishna is karishma)

हे ही वाचा :

विराटला अगोदरच अंदाज आला होता, कृष्णा ‘प्रसिद्ध’ होणार आणि झालंही तसंच…!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.