IND vs ENG: टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी एडिलेडला पोहोचली, बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ
एडिलेडला टीम इंडियाची मॅच इंग्लंडविरुद्ध 10 तारखेला होणार आहे.
मेलबर्न : टीम इंडियाने (Team India) आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत (T20 world cup 2022) चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या पाकिस्तान, इंग्लंड, इंडिया, न्यूझिलंड या टीम सेमीफायनलमध्ये पोहोचल्या आहेत. टीम इंडियाचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादव (Suryakumar yadav) सध्या अधिक चर्चेत आहे.
Touchdown Adelaide ?#TeamIndia | #T20WorldCup pic.twitter.com/absGUDySIK
हे सुद्धा वाचा— BCCI (@BCCI) November 7, 2022
एडिलेडला टीम इंडियाची मॅच इंग्लंडविरुद्ध 10 तारखेला होणार आहे. आज तिथं टीम इंडिया दाखल झाली आहे. विशेष म्हणजे टीम मैदानात दाखल झाल्याचा एक व्हिडीओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
टीम इंडियाकडे अजून सराव करण्यासाठी दोन दिवस आहे. तिथल्या मैदानावर दोन दिवस सराव झाल्यानंतर इंग्लंडविरुद्ध मॅच होणार आहे. इंग्लंड टीमने सुद्धा चांगली आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.