Video : सॅम करनने भडकवलं, हार्दिक करनच्या मागे पळाला, अंपायर्सने थांबवलं, पाहा मैदानात काय काय घडलं…?

सॅम करन हलक्या आवाजात हार्दिकला उद्देशून काहीतरी बोलला. हार्दिकने तो काय बोलला हे ऐकलं नाही. पण ओव्हर्स संपल्यानंतर तो करनच्या मागे पळाला. hardik pandya And Sam Curran Fight

Video : सॅम करनने भडकवलं, हार्दिक करनच्या मागे पळाला, अंपायर्सने थांबवलं, पाहा मैदानात काय काय घडलं...?
Ind vs England 2nd ODI hardik pandya And Sam Curran Fight
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 8:05 AM

पुणेटीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India Vs England 2nd ODI) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 6 विकेट्सने पराभव झाला. पहिल्यांदा के.एल.राहुल (KL Rahul), विराट कोहली (Virat Kohli) आणि नंतर रिषभ पंत (Rishabh Pant) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी तडाखेबंद बॅटिंग करत 336 धावांचा विशाल डोंगर उभा केला. इंग्लंडच्या बॅट्समनने देखील भारतीय फलंदाजांचा कित्ता गिरवला. जेसन रॉय (Jayson Roy), जॉनी बेअरस्टो (jonny bairstow), बेन स्टोक्स (Ben Stokes) यांनी आतिषी खेळी खेळल्या. भारताने विजयासाठी 337 धावांचं दिलेलं आव्हान इंग्लंडने अगदी सहज पूर्ण केलं. (Ind vs England 2nd ODI hardik pandya And Sam Curran Fight)

ही मॅच अनेक कारणांसाठी खास राहिली. के.एल. राहुल आणि जॉनी बेअरस्टोचं शतक, पंत आणि हार्दिकच्या आक्रमक इनिंग आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे बेन स्टोक्सने पुण्याच्या गहुंजे मैदानावर पाडलेला षटाकारांचा पाऊस…! हे असं सगळं असलं तरी मॅचमधील आणखी एका प्रसंगाने क्रिकेटरसिकांचं लक्ष वेधून घेतलं. ती घटना म्हणजे हार्दिक पांड्या आणि सॅम करन यांच्यातली तू तू मैं मैं…!

मैदानात नेमकं काय घडलं…?

ही घटना भारतीय डावाच्या 46 व्या ओव्हर्समध्ये घडली. हार्दिकने सॅम करनच्या एकाच ओव्हर्समध्ये तीन खणखणीत षटकार खेचून 21 रन्स काढले. याच ओव्हर्सच्या शेवटच्या बॉलवर हार्दिकला आणखी एक उत्तुंग फटका खेळायचा होता. पण त्याचा अंदाज चुकला. यानंतर तो स्वत:वरच नाराज झालेला पाहायला मिळाल. हीच संधी साधून सॅम करनने त्याला डिवचलं.

सॅम करन हलक्या आवाजात हार्दिकला उद्देशून काहीतरी बोलला. हार्दिकने तो काय बोलला हे ऐकलं नाही. पण ओव्हर्स संपल्यानंतर तो करनच्या मागे पळाला. योग्य आवाजात माझ्याशी बोलायचं, असं हार्दिकने सॅमला सुनावलं. हे सगळं सुरु असताना या दोघांमध्ये मैदानी अंपायरला मध्यस्थी करावी लागली. दोन्ही खेळाडूंना अंपायर्सनी शांत केलं.

पाहा व्हिडीओ :

हार्दिकच्या 16 चेंडूत 35 धावा

हार्दिक आणि सॅम करनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हार्दिकने 16 चेंडूवर 35 धावा ठोकल्या. त्याने तुफानी अंदाजात बॅटिंग केली. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे हार्दिकने इंग्लंडच्या डावादरम्यान गोलंदाजी केली नाही.

(Ind vs England 2nd ODI hardik pandya And Sam Curran Fight)

हे ही वाचा :

Ind vs Eng : एका रन्सने शतक हुकलं, आकाशाकडे पाहत दिवंगत पित्याला ‘सॉरी’ म्हटलं, पुण्यात बेन स्टोक्सचा झंझावात!

Ind Vs Eng : भारतीय बोलर्सची पिसं काढली, गगनचुंबी 10 षटकार, पुण्यात बेन स्टोक्सचा ‘हा’ जबरा रेकॉर्ड!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.