IND vs PAK : पावसामुळे चाहत्यांची निराशा, भारत पाकिस्तान मॅच रद्द होण्याची शक्यता

रविवारच्या मॅचची आतापासून चाहत्यांनी जगभरातील माजी क्रिकेट खेळाडूंना उत्सुकता लागली आहे.

IND vs PAK : पावसामुळे चाहत्यांची निराशा, भारत पाकिस्तान मॅच रद्द होण्याची शक्यता
IND vs NZ Weather Report
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 20, 2022 | 7:56 AM

मेलबर्न : येत्या रविवारी टीम इंडियाची (Team India) पाकिस्तानसोबत (Pakistan) मेलबर्न (Melbourne Stadium) भव्य अशा मैदानात मॅच होणार आहे. त्याची आतुरता जगभरातील क्रिकेट चाहत्यांना लागली आहे. काही दिवसांपुर्वीच मॅचच्या तिकीटांची विक्री झाली आहे. त्यामुळे मॅच सुरु असताना मैदान एकदम भरगच्च पाहायला मिळणार आहे. येत्या रविवारी मॅच होणार आहे, परंतु त्यावर पावसाचं सावट असल्याची माहिती मिळाली आहे. ऑस्ट्रेलियातील हवामान अंदाजनुसार त्यादिवशी 80 टक्के पावसाची शक्यता आहे.

विशेष म्हणजे फक्त रविवारी पाऊस पडणार नाही, शुक्रवार, शनिवारी सुध्दा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांची निराशा होईल. पाऊस सुरु झाल्यानंतर मॅच खेळवायची की नाही हा निर्णय आयसीसी घेईल.

रविवारच्या मॅचची आतापासून चाहत्यांनी जगभरातील माजी क्रिकेट खेळाडूंना उत्सुकता लागली आहे. काही क्रिकेटच्या माजी खेळाडूंनी विश्वचषकाची भविष्यवाणी सुद्धा वर्तवली आहे.

टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्‍व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

पाकिस्तान टीम

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.