Ind vs Pak T20 World Cup : पाकिस्तान संघाचं इतक्या धावांचं आव्हान, बिस्माहची अर्धशतकी खेळी
भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यामध्ये पाकिस्तान संघाने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यामध्ये पाकिस्तान संघाने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाने निर्धारित 20 षटकांमध्ये 149 धावा केल्या. पाकिस्तान संघाकडून कर्णधार बिस्माहने सर्वाधिक नाबाद 68 धावा केल्या. भारताकडून राधा यादवने 2 विकेट्स घेतल्या. भारताला जिंकण्यासाठी 150 धावांचं लक्ष्य असणार आहे.
न्यूलँड्स मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानची सुरूवात निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकामध्ये दीप्ती शर्माने सलामीवीर जवेरिया खानला 8 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार बिस्माहने मैदानावर तळ ठोकला. मुनीबा अलीला 12 धावांवर राधा यादवने माघारी पाठवलं. चौथ्या नंबरवर आलेल्या निदा दारला पूजा वस्त्राकरने भोपळाही फोडू दिला नाही.
सिद्रा अमीनही फार काही वेळ मैदनात टिकली नाही. राधा यादवने 11 धावांवर बाद केलं, त्यानंतर आलेल्या आयशा नसीमने आक्रमक पवित्रा घेतला. आयशा आणि बिस्माह या जोडीने भारतीय गोलंदाजांचा घाम फोडला. बिस्माहने अर्धशतकी 68 धावांची महत्त्वाची खेळी केली. आयेशाने अवघ्या 25 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या.
दरम्यान, आयशा आणि बिस्माह यांच्या 47 बॉलच्या 81 धावांची भागीदारी करत संघाला 150 धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. भारताने या सामन्यात कॅच सोडले याचा फटका भारतीय संघाल बसला. भारताची स्ट्राईक बॉलर रेणूका सिंहला एकही बळी मिळवता आला नाही.
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड.
पाकिस्तानः बिस्माह मारूफ (कर्णधार), आलिया रियाझ, आयमान अन्वर, आयशा नसीम, फातिमा सना, जवेरिया खान, मुनीबा अली, सदफ शम्स, नशरा संधू, निदा दार, ओमामा सोहेल, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज, तुबा हसन.