Ind vs Pak T20 World Cup : भारत-पाकिस्तान सामन्याआधी दोन्ही कॅप्टन्सचा ‘तो’ व्हिडीओ समोर

| Updated on: Feb 12, 2023 | 4:37 PM

सामना सुरू होण्यासाठी काही तासांचा अवधी राहिला आहे. त्याआधी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूप यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Ind vs Pak T20 World Cup : भारत-पाकिस्तान सामन्याआधी दोन्ही कॅप्टन्सचा तो व्हिडीओ समोर
Follow us on

मुबंई : आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कपमधील भारतीय संघाचा पहिला सामना आज होणार आहे. सामना सुरू होण्यासाठी काही तासांचा अवधी राहिला आहे. त्याआधी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूप यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. भारत पाकिस्तानमधील सामना म्हणजे हाय व्होल्टेज सामना असतो हे क्रिकेटविश्वातील सर्व चाहत्यांना माहित आहे. सामना खेळण्याआधी दोन्ही संघावर दबाव असतोच हे आपण पुरूष क्रिकेट सामन्यांमध्ये पाहिलं आहे. मात्र आता एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये हरमन आणि बिस्मा सामन्याचं टेन्शन बाजूला ठेवत मस्ती करताना दिसत आहेत.

सामन्याआधी हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूफ यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. दोन्ही कर्णधार सामना खेळण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये बिस्माह आणि हरमनप्रीत भांगड्याच्या स्टेप्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर दोघींचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

 

आजचा रविवार सुपर सनडे ठरणार असून संध्याकाळी 6.30 वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ एकाच गटात आहेत. त्यासोबतच आयर्लंड, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांचा ‘ब’ गटामध्ये समावेश आहे. पहिल्या सामन्यामध्ये कोण विजयाचा श्रीगणेशा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भारत आणि पाकिस्तान याआधी टी-20 वर्ल्ड कपमध्ये 6 वेळा आमनेसामने आले आहेत. यामधील 4 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. आताच पार पडलेल्या आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तान संघाने पराभव केला होता. आता भारतासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे ती म्हणजे भारतीय संघातील महत्त्वाची खेळाडू स्मृती मंधानाची दुखापत. टी-20 वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये तिच्या हाताला दुखापत झाली होती. पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत संभ्रम आहे.

भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवाणी, पूजा वस्त्राकार, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड.

पाकिस्तान संघ : बिस्माह मारूफ (कर्णधार), आलिया रियाझ, आयमान अन्वर, आयशा नसीम, ​​फातिमा सना, जवेरिया खान, मुनीबा अली, सदफ शम्स, नशरा संधू, निदा दार, ओमामा सोहेल, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज, तुबा हसन.