Ind Vs Sa T20 Series: दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी टीम इंडियात मोठा बदल, पहिला सामना 9 जून रोजी दिल्लीत होणार
कमलेश जैनने 10 वर्षे आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्ससोबत काम केले आहे. आता तो टीम इंडियामध्ये सामील झाला आहे. 6 जून रोजी भारतीय संघ दिल्लीत सराव करत होता, त्यावेळी कमलेश जैन संघासोबत होता.
मुंबई – भारत (India) आणि आफ्रिका (South Africa) यांच्यातील टी-20 मालिका येत्या 9 जूनपासून सुरू होईल. भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी चांगली आयपीएल खेळली आहे. त्यामुळे भारतीय सध्याच्या स्थितीत मजबूत मानला जात आहे. नवी दिल्लीत संघाचा सराव सुरू झाला आहे. केएल राहुलच्या (kl Rahul) नेतृत्वाखाली भारतीय संघ ही मालिका जिंकण्यासाठी उतरणार आहे. विशेष म्हणजे यावेळी एक नवीन सदस्यही संघात सामील झाला आहे. टीम इंडियाला आता एक नवा फिजिओ मिळाला आहे. कोलकाता नाइट रायडर्सचे कमलेश जैन (Kamlesh Jain) टीम इंडियामध्ये फिजिओ म्हणून सामील झाले आहेत. तो दीर्घकाळ भारतीय संघाचा सदस्य असलेल्या नितीन पटेलची जागा घेईल. नितीन पटेल यांच्याकडे आता नवी जबाबदारी देण्यात आली असून ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाहायला मिळतील अशी माहिती मिळाली आहे.
First practice session ✅
हे सुद्धा वाचाSnapshots from #TeamIndia‘s training at the Arun Jaitley Stadium, Delhi. ? ? #INDvSA | @Paytm pic.twitter.com/6v0Ik5nydJ
— BCCI (@BCCI) June 6, 2022
पहिला सामना 9 जून रोजी दिल्लीत होणार
कमलेश जैनने 10 वर्षे आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्ससोबत काम केले आहे. आता तो टीम इंडियामध्ये सामील झाला आहे. 6 जून रोजी भारतीय संघ दिल्लीत सराव करत होता, त्यावेळी कमलेश जैन संघासोबत होता. भारतीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील पहिला सामना 9 जून रोजी दिल्लीत होणार आहे. यानंतर 12, 14, 17, 19 जून रोजी सामने होणार आहेत. आयपीएल संपल्यानंतर लगेचं टीम इंडियाची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका आहे. आयपीएलमध्ये खेळलेल्या खेळाडूंचा फायदा होणार आहे.
सरावाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
भारतीय संघ सराव करत असल्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रशिक्षक राहुल द्रविड देखील संघासोबत आहे. तो पहिल्या इंग्लंड दौऱ्यासाठी लवकर रवाना होणार होता. संपुर्ण मालिका तो भारतीय संघासोबत राहील अशी माहिती मिळाली आहे.