Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कौतुकास्पद! दीप्ती शर्माने ते केलं जे पोरांनाही जमलं नाही, असा विक्रम करणारी पहिलीच खेळाडू

आयसीसी महिला 20 वर्ल्ड कपमधील भारताचा  दुसरा सामना वेस्ट इंडिजसोबत सुरू आहे. या सामन्यामध्ये भारताच्या दीप्ती शर्माने सर्वाधिक 3 विकेट्स घेत  मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

कौतुकास्पद! दीप्ती शर्माने ते केलं जे पोरांनाही जमलं नाही, असा विक्रम करणारी पहिलीच खेळाडू
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 9:13 PM

केपटाऊन : आयसीसी महिला 20 वर्ल्ड कपमधील भारताचा  दुसरा सामना वेस्ट इंडिजसोबत सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने निर्धारित 20 षटकात 118 धावा केल्या.  या सामन्यामध्ये भारताच्या दीप्ती शर्माने सर्वाधिक 3 विकेट्स घेत  मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. दीप्ती शर्माने टी-20 क्रिकेटमध्ये  100 बळी घेतले आहेत. अशी कामगिरी करणारी दीप्ती  पहिलीच खेळाडू ठरली आहे.

दीप्ती शर्माने 89 सामन्यांमध्ये 100 बळी घेतले आहेत, त्या पाठोपाठ भारताची अनुभवी फिरकीपटू पुनम यादवने 72 सामन्यांमध्ये 98 बळी घेतलेत. वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यामध्ये स्टैफनी टेलर 42 धावा, शेमेन कैंपबेल 30 धावा आणि अफी फ्लेचर 0 धावा यांना बाद करत आपला 100 बळींचा टप्पा पूर्ण केला.

मेन्स क्रिकेटमध्येही 100 बळी कोणत्याही खेळाडूला घेता आले नाहीत. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने 75 सामन्यांमध्ये सर्वाधिक 91 बळी घेतले आहेत. त्यापाठोपाठ वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने 87 सामन्यांमध्ये 90 बळी घेतले आहेत.

वेस्ट इंडिज बॅटींग :

प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजची सुरूवात खराब झाली होती. सामन्याच्या दुसऱ्या षटकातच पुजा वस्त्राकरने कर्णधार हेले मैथ्यूजला बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या शेमेन कैंपबेलने आणि स्टैफनी टेलरने भागादारी केली होती.  14 व्या ओव्हरमध्ये दीप्ती शर्माने जोडी फोडत संघाला यश यश मिळवून दिलं. दीप्तीने कैंपबेलने 30 धावांवर माघारी पाठवलं.

दुसरी विकेट गमावल्यानंतर वेस्ट इंडिजच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करत आली नाही. दीप्ती शर्माने 3, पुजा वस्त्राकर आणि रेणुका सिंह यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. एकंदरित या सामन्यामध्ये भारताच्या गोलंदाजांनी कमाल कामगिरी केली.

भारत महिला (प्लेइंग इलेवन): स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कप्तान), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, देविका वैद्य, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकुर सिंह

वेस्टइंडीज महिला (प्लेइंग इलेवन): हेले मैथ्यूज (कप्तान), स्टैफनी टेलर, शेमेन कैंपबेल, शबिका गजनबी, चिनले हेनरी, चेडियन नेशन, अफी फ्लेचर, शामिलिया कॉनेल, रशादा विलियम्स (विकेटकीपर), करिश्मा रामहरैक, शकीरा सेलमैन

वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?.
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.