India vs England T20 Series | मी इंग्लंड विरुद्ध कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी सज्ज, ‘हा’ आक्रमक फलंदाज इंग्लंडला पराभूत करण्यासाठी उत्सुक

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी (India and England T20I series) आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या इशान किशनला (Ishan Kishan) संधी देण्यात आली आहे.

India vs England T20 Series | मी इंग्लंड विरुद्ध कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी सज्ज, 'हा' आक्रमक फलंदाज इंग्लंडला पराभूत करण्यासाठी उत्सुक
इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी (India and England T20I series) आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या इशान किशनला (Ishan Kishan) संधी देण्यात आली आहे.
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 5:34 PM

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England T20 Series) यांच्यात सध्या 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाकडून अनेक युवा फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. त्यापैकी एक म्हणजेच (Ishan Kishan) इशान किशन. इशान किशनवर निवड समितीने (indian cricket selection committee) विश्वास दाखवून संधी दिली. यासाठी त्याने समितीचे आभार मानले आहेत. तसेच मी या मालिकेत कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास सज्ज असल्याचं इशान म्हणाला. (India and England T20I series ishan kishan is ready to play at any number)

इशान काय म्हणाला?

“माझ्यावर विश्वास दाखवून मला संधी दिलीत. त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. आपल्या देशाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. माझी निवड झाली. हा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत”, अशी प्रतिक्रिया इशानने दिली. त्याने Wisden या वेबसाईटला मुलाखत दिली. यावेळेस तो बोलत होता.

“रोहित शर्माकडून शिकायला मिळालं”

इशान आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळतो. “ड्रेसिंग रुममध्ये अनेक खेळाडू असतात. त्यांचा सहवास लाभतो. त्यामुळे त्यांच्याकडून खूप काही शिकायलं मिळतं. आपण त्याच्यांसारखं खेळायचा प्रयत्न करतो. मला रोहित शर्माकडून खूप काही शिकायला मिळालं.

“कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास सज्ज”

“मी इंग्लंड विरुद्धच्या या टी 20 सीरिजमध्ये टीम ज्या नंबरवर खेळवेल त्या नंबरवर खेळण्यासाठी तयार आहे. मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीत टॉप ऑर्डर ते मिडल ऑर्डरमध्ये प्रत्येक क्रमांकावर खेळलो आहे. यामुळे तुम्हाला निर्णायक क्षणी कशी कामगिरी करायची, याचा अनुभव मिळतो. त्यामुळे मी कोणत्याही क्रमांकावर खेळू शकतो”, असं इशानने स्पष्ट केलं. इशान देशांतर्गत स्पर्धेत झारखंडचे नेतृत्व करतो.

“फलंदाजीच्या शैलीत कोणताही बदल नाही”

“मी आयपीएलच्या 13 व्या मोसमासाठी माझ्या खेळण्याच्या शैलीत कोणताही बदल केला नव्हता. फक्त क्रिकेटप्रती असलेली निष्ठेच्या जोरावर मी कामगिरी केली”, असं उत्तर इशानने आयपीएल 2020 मधील खेळात बदल केला होता का, या प्रश्नावर दिलं.

यशाचं श्रेय मुंबई इंडियन्सला

इशानने आपल्या आयपीएल टीम मुंबई इंडियन्सचं कौतुक केलं. माझ्या खेळीत सकारात्मक बदल झाला आहे. तसेच मी आज जे काही आहे ते या मुंबई टीममुळे आहे. इशान पहिल्यांदा 2018 मध्ये मुंबईकडून खेळला होता. तेव्हा मुंबईने इशानला 5. 5 कोटी मोजून आपल्या ताफ्यात घेतलं होतं. तेव्हा पासून इशान मुंबईकडून खेळतोय.

गत मोसमात सर्वाधिक षटकार

सिक्स म्हटलं की आपल्याला सर्वात आधी आठवतो (Chris Gayle) ख्रिस गेल. गेल आपल्या तडाखेदार खेळीसाठी आणि गगनचुंबी सिक्ससाठी प्रसिद्ध आहे. अशा दिग्गद फलंदाजाला न जमलेली कामगिरी इशानने गेल्या मोसमात केली होती. इशानने गेल्या पर्वात सर्वाधिक सिक्स खेचण्याचा विक्रम केला होता. इशानने या हंगामात एकूण 30 सिक्स लगावले होते.

इशान किशनची 13 व्या मोसमातील कामगिरी

इशानने 13 व्या मोसमातील 14 सामन्यातील 13 डावात बॅटिंग केली. यामध्ये त्याने 145.76 च्या स्ट्राईक रेटने तसेच 57.33 च्या सरासरीने 13 डावांमध्ये 36 चौकार आणि 30 षटकारांसह 516 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. इशानची 99 ही या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या आहे.

संबंधित बातम्या :

India vs England 1st T20 | नरेंद्र मोदी मैदानाच्या खेळपट्टीवर विराट कोहलीचं मोठं भाष्य

तर माझा टीव्ही बंद राहील, ‘हिटमॅनला’ डच्चू दिल्याने ‘सुलतान’ विराटवर भडकला

IPL 2021 | ‘या’ स्टार क्रिकेटपटूला तुम्ही ओळखलंत का?

(India and England T20I series ishan kishan is ready to play at any number)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.