Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : अर्धशतकवीर श्रेयस, साहाने सावरलं, 234 धावांवर भारताचा डाव घोषित, न्यूझीलंडला 284 धावांचं आव्हान

दिवसाची अवघी 4-5 षटकं बाकी असताना भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे याने भारताचा डाव घोषित केला आणि त्याचं फळ भारताला मिळालं आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 4 षटकात एका विकेटच्या बदल्यात 4 धावा जमवल्या आहेत.

IND vs NZ : अर्धशतकवीर श्रेयस, साहाने सावरलं, 234 धावांवर भारताचा डाव घोषित, न्यूझीलंडला 284 धावांचं आव्हान
Kapur Test
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 5:15 PM

कानपूर : भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने भारताला 345 धावांवर रोखलं. त्यानंतर भारतीय गोलंदाजी आक्रमणासमोर न्यूझीलंडला 142.3 षटकांमध्ये सर्वबाद 296 धावांवरपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने 7 बाद 234 धावांवर आपला डाव घोषित केला आहे आणि न्यूझीलंडला विजयासाठी 284 धावांचं लक्ष्य दिलं आहे. (India declared second inning at 234 run, New Zealand need 284 runs to win Kanpur Test)

दरम्यान, दिवसाची अवघी 4-5 षटकं बाकी असताना भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे याने भारताचा डाव घोषित केला आणि त्याचं फळ भारताला मिळालं आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 4 षटकात एका विकेटच्या बदल्यात 4 धावा जमवल्या आहेत. रवीचंद्रन अश्विनने सलामीवीर विल यंगला 2 धावांवर असताना पायचित पकडलं. त्यामुळे आता पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी 9 विकेट्सची तर न्यूझीलंडला 279 धावांची आवश्यकता आहे.

भारताची आजच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. सकळाच्या सत्रात सुरुवातीला भारताने चेतेश्वर पुजाराची (22) विकेट गमावली. त्यानंतर पाठोपाठ अजिंक्य रहाणेदेखील माघारी परतला. रहाणेनंतर मैदानात आलेला रवींद्र जाडेजादेखील शून्यावर बाद झाला. त्यामुळे भारताची आवस्था 5 बाद 51 अशी झाली होती. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने रवीचंद्रन अश्विनच्या (32) साथीने भारताचा डाव सावरला. दोघांनी 6 व्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आलेल्या ऋद्धीमान साहाला सोबत घेऊन श्रेयसने धावफलक हलता ठेवला. या दोघांनी 7 व्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. श्रेयसने या डावात 8 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 65 धावांची खेळी केली. श्रेयस बाद झाल्यानंतर साहा आणि अक्सर पटेलने 8 व्या विकेटसाठी नाबाद 67 धावांची भागीदारी केली. या तीन भागीदाऱ्यांच्या जोरावर भारताने 7 बाद 234 धावांवर डाव घोषित केला. साहाने 126 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 61 धावांची खेळी केली.

न्यूझीलंडला पहिला डाव

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (काल) भारतीय गोलंदाजांनी चांगलंच पुनरागमन केलं. भारतीय गोलंदाजांनी किवी संघाचा डाव 142.3 षटकांमध्ये 296 धावांवर रोखला. त्यामुळे टीम इंडियाला 49 धावांची नाममात्र आघाडी मिळाली. न्यूझीलंडच्या सलामीवीरांव्यतिरिक्त एकाही किवी फलंदाजाला मोठी खेळी उभारता आली नाही. आज सकाळच्या सत्रात रवीचंद्रन अश्विनने आक्रमक विल यंग याला 89 धावांवर असताना बाद करत भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यंगने 214 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने ही खेळी उभारली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने एकेका किवी फलंदाजाला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. याचदरम्यान, खेळपट्टीला चिकटून बसलेल्या टॉम लॅथम याला अक्षर पटेलने बाद केलं. लॅथमने 282 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 95 धावांची खेळी केली. तर कर्णधार केन विलियम्सन (18), रॉस टेलर (11), हेन्री निकोलस (2), टॉम ब्लंडेल (13), रचिन रवींद्र (13) हे फलंदाज केवळ हजेरी लावून गेले. तसेच गोलंदाजांनादेखील काही चांगली कामगिरी करता आली नाही. काईल जेमिसनने 23 धावांचं योगदान दिलं.

अक्षर पटेलचा ‘पंच’

दरम्यान, भारताकडून फिरकीपटू अक्षर पटेलने सर्वात किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने 34 षटकांपैकी 6 षटकं निर्धाव टाकत 62 धावा दिल्या, बदल्यात न्यूझीलंडचे 5 फलंदाज बाद केले. त्याला रवी अश्विननने 3 बळी घेत चांगली साथ दिली. उमेश यादवने धोकादायक केन विलियम्सनला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर रवींद्र जाडेजाने एक विकेट घेतली.

भारताचा पहिला डाव

तत्पूर्वी गुरुवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर टीम इंडियाचा पहिला डाव 345 धावांवर आटोपला. श्रेयस अय्यरचं शतक, शुभमन गिल आणि रवींद्र जाडेजाची अर्धशतकं यांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 345 धावांपर्यंत मजल मारली. अय्यर 105, शुभमन गिल 52, रवींद्र जाडेजा 50 आणि आर आश्विननं 38 धावांचं योगदान दिलं. न्यूझीलंडकडून टिम साऊथीने 5, काईल जेमिसनने 3 आणि एजाज पटेलने 2 विकेट घेतल्या.

इतर बातम्या

IND vs NZ: श्रेयस अय्यरकडून रेकॉर्ड्सचा पाऊस, पदार्पणाच्या कसोटीत शतक आणि अर्धशतक ठोकणारा पहिलाच फलंदाज

खराब बॅटिंगने लाजिरवाणा रेकॉर्ड, अजिंक्य रहाणेच्या निरोपाची वेळ, शतकवीर श्रेयस अय्यरला संधी

IND vs NZ : टीम इंडियाची भिंत ढासळतेय, चेतेश्वर पुजाराला मुंबई कसोटीतून डच्चू मिळणार?

(India declared second inning at 234 run, New Zealand need 284 runs to win Kanpur Test)

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.