T20 World Cup: भारत-इंग्लंडचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर ही टीम फायनलमध्ये जाईल
आजचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास, ही टीम फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळेल
एडिलेड : विश्वचषकातील (T20 World Cup) दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडिया (Team India) प्रथम फलंदाजी करणार आहे. आज टीम इंडिया आणि इंग्लंड (ENG) यांच्यात महामुकाबला एडिलेडच्या मैदानात सुरु आहे. पाकिस्तानच्या टीमने न्यूझिलंड टीमचा पराभव केला, त्यामुळे पाकिस्तानची टीम फायनलमध्ये पोहोचली आहे. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत अनेकदा पावसामुळे सामना रद्द झाला आहे.
आजच्या सामन्यात समजा पाऊस आला तर काय होऊ शकतं ?
आयसीसीने पाऊस पडत असल्यामुळे महत्त्वाच्या मॅचसाठी राखीव दिवस ठेवले आहेत. आज पावसामुळे तिथं सामना होऊ शकला नाही, तर दुसऱ्या दिवशी दहा ओव्हरचा सामना खेळवला जाईल. दुसऱ्या दिवशी सुद्धा पावसाने गोंधळ घातला, तर टीम इंडिया थेट फायनलमध्ये जाईल. कारण टीम इंडिया वेगळ्या गटात क्रमांक 1 ला आहे. दुसऱ्या गटात इंग्लंड टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
इंग्लंड टीम
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, अॅलेक्स हेल्स, हॅरी ब्रुक, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड.
रेकॉर्ड
22 वेळा मॅच झाली
टीम इंडिया 12 वेळा जिंकली
इंग्लंड टीम 10 वेळा जिंकली
T20 विश्वचषकात 3 वेळा आमनेसामने
भारत 2 वेळा जिंकला
इंग्लंड टीम 1 जिंकली
2007 – भारत 18 धावांनी जिंकला
2009 – इंग्लंड 3 धावांनी विजयी
2012 – भारत 90 धावांनी विजयी