Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia 2020 | फिंच-वॉर्नरची सलामी शतकी भागीदारी, इतिहासात पहिल्यांदाच भारताच्या नावावर नकोसा विक्रम

कांगारुंच्या ओपनिंग जोडीच्या बहारदार परफॉरमन्सनंतर भारताच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.

India vs Australia 2020 | फिंच-वॉर्नरची सलामी शतकी भागीदारी, इतिहासात पहिल्यांदाच भारताच्या नावावर नकोसा विक्रम
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 12:30 PM

सिडनीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia 2020) दुसऱ्या वनडे सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी कमाल केली. डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि अ‌ॅरॉन फिंचने (Aron Finch) पहिल्या विकेटसाठी 142 रन्सची भागीदारी रचली. मालिकेत दुसऱ्यांदा डेव्हिड वॉर्नर-अ‌ॅरॉन फिंच जोडीने शतकी सलामी दिली. कांगारुंच्या ओपनिंग जोडीच्या बहारदार परफॉरमन्सनंतर भारताच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. इतिहासात आतापर्यंत असा विक्रम भारताच्या नावावर नोंदवला गेला नव्हता. (India For the First Time In History have 3 Consistancy 100 opening partnership)

भारतीय संघाच्या एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदा घडलीये की सलग तीन मॅचमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या ओपनिंग जोडीने शतकी भागीदारी रचली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या एकदिवसीय सामन्यात डेव्हिड वॉर्नर-अ‌ॅरॉन फिंच जोडीने पहिल्या विकेटसाठी 156 रन्सची पार्टनरशीप केली. आज तोच कित्ता गिरवत फिंच-वॉर्नर जोडीने 142 रन्सची भागीदारी करुन ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करुन दिली. या  दोन मॅचच्या अगोदर भारत शेवटचा एकदिवसीय सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्या शेवटच्या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या ओपनिंग जोडीने शतकी सलामी दिली होती. न्यूझीलंडच्या ओपनर्सनी 106 धावांची भागीदारी केली होती.

भारताने आतापर्यंतच्या इतिहासात 978 एकदिवसीय मॅच खेळल्या आहेत. या मॅचेसमध्ये असं एकदाही झालं नव्हतं की प्रतिस्पर्धी संघाच्या बॅट्समनने भारताविरुद्ध सलग तीनदा शतकी भागीदारी रचल्या होत्या. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताच्या नावे आता नको असणारा विक्रम नोंदवला गेला आहे.

भारताविरुद्ध सलग तीन शतकी भागीदारी

गप्टील-निकोल्स (न्यूझीलंड)- 106 रन्स

फिंच-वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)- 156 रन्स

फिंच-वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) 142 रन्स

(India For the First Time In History have 3 Consistancy 100 opening partnership)

संबंधित बातम्या

India vs Australia 2020 | विराट कोहलीने रचला इतिहास, हा रेकॉर्ड करणारा 9 वा भारतीय खेळाडू

Ind vs Aus 2020, 2nd ODI Live Score Updates | ऑस्ट्रेलिया पहिला धक्का, अ‌ॅरॉन फिंच 60 धावांवर बाद

India vs Australia 1st ODI  : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची कमाल, भारताचा 66 धावांनी पराभव

Photo | IND vs AUS : सिडनी वनडेमध्ये या पाच कारणांमुळे भारताचा पराभव, कांगारुंची दादागिरी!

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....