विराटच्या स्वप्नातील ‘नवा भारत’, 6 वर्षांपूर्वी एक स्वप्न पाहिलं, मेहनत घेतली, आज ते पूर्ण झालं!

कसोटी क्रिकेटमध्ये भारताला हे स्थान काही सहज मिळालं नाहीय. त्यासाठी भारतीय संघाला अपार मेहनत घ्यावी लागली आहे. आज भारताचा जगात बोलबाला आहे, तो एका दिवसांत झालेला नाही. विराट कोहलीला याचं मोठं श्रेय जातं. (India Topped ICC Top Ranking Virat Kohli Dreams Comes True)

विराटच्या स्वप्नातील 'नवा भारत', 6 वर्षांपूर्वी एक स्वप्न पाहिलं, मेहनत घेतली, आज ते पूर्ण झालं!
त्यानंतर दुसरे दुहेरी शतक कर्णधार विराट कोहलीच्या बॅटमधून निघाले. कोहलीने देखील नाबाद 254 धावा केल्या होत्या. पुण्यात त्याने ही अप्रतिम खेळी केली होती.
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 6:40 AM

मुंबई : आयसीसीने नुकतेच टेस्ट रॅकिंग(Icc Test Ranking) जाहीर केली आहे. यामध्ये टीम इंडियाने (Team India) आपला थाट कायम राखलाय. विराट सेनेने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलंय. विशेष म्हणजे विराटसेनेने गेल्या 5 वर्षांपासून अव्वल स्थान कायम राखलं आहे. आयसीसीने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली. टीम इंडियाने इंग्लंडला (England) कसोटीत धूळ चारली. तर ऑस्ट्रेलियाला (Australia) त्यांच्याच भूमीत चारी मुंड्या चीत केलं. टीम इंडियाने इंग्लंडचा 3-1 तर ऑस्ट्रेलियाला 2-1 च्या फरकाने पराभूत केलं होतं. या कामगिरीचा फायदा टीम इंडियाला क्रमवारीत झाला आहे. याचसोबत विराट कोहलीने 6 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आज ते साकार झालंय. (India Topped ICC Top Ranking Virat Kohli Dreams Comes True)

विराटचं स्वप्न साकार

कसोटी क्रिकेटमध्ये भारताला हे स्थान काही सहज मिळालं नाहीय. त्यासाठी भारतीय संघाला अपार मेहनत घ्यावी लागली आहे, रात्रीचा दिवस करावा लागला आहे. आज भारताचा जगात बोलबाला आहे, तो एका दिवसांत झालेला नाही. अनेक दिग्गजांना त्यांच्यात भूमीत जाऊन त्यांना आस्मान दाखावण्याची अद्वितीय कामगिरी टीम इंडियाने करुन दाखवली आहे. आज ताकदीचे संघ भारतीय संघासोबत खेळण्यास कचरतात. विराटच्या स्वप्नातील नवा भारत, जे स्वप्न त्याने 6 वर्षांपूर्वी पाहिलं होतं की कमीत कमी 5 वर्ष कसोटी क्रिकेटमध्ये भारत जगावर राज करेल… आज त्याचं स्वप्न साकार झालंय.

विराटचं स्वप्न सत्यात उतरलं!

भारताने या वर्षी आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं आणि विराटचं स्वप्न साकार झालं. भारताने पाठीमागील सलग पाच वर्ष जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलंय. भारताने 2017, 2018, 2019, 2020 आणि आता 2021 असे सलग पाच वर्ष सगळ्यांना धूळ चारत कसोटी अव्वल स्थान मिळवलंय.

टीम इंडिया अव्वलस्थानी

टीम इंडिया 121 रेटिंग्स पॉइंट्ससह पहिलं स्थान कायम राखण्यात यशस्वी राहिली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडची टीम आहे. टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये अवघ्या 1 रेटिंग पॉइंटचा फरक आहे. न्यूझीलंडच्या नावे 120 पॉइंट्स आहेत. न्यूझीलंडने वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानचा कसोटी मालिकेत 2-0 ने पराभव केला होता.

इंग्लंडची झेप तर ऑस्ट्रेलियाची घसरण

या क्रमवारीत इंग्लंडला एका स्थानाचा फायदा तर ऑस्ट्रेलियाची घसरण झाली आहे. इंग्लंडने चौथ्या क्रमांकावरुन तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर ऑस्ट्रेलियाची तिसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. इंग्लंडच्या नावे 109 तर ऑस्ट्रेलियाकडे 108 पॉइंट्स आहेत. तर पाकिस्तान 5 व्या स्थानी कायम आहे.

(India Topped ICC Top Ranking Virat Kohli Dreams Comes True)

हे ही वाचा :

ICC Test Ranking | टीम इंडियाची सलग 5 वर्ष बादशाहत कायम, आयसीसीच्या वार्षिक क्रमवारीत विराट सेना अव्वलस्थानी

Ramesh Powar | दिग्गजांना पछाडत रमेश पोवार भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.