Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Vs Australia 2020 | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी हिटमॅन रोहित शर्माऐवजी ‘या’ खेळाडू मिळू शकते संधी

 टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामने खेळणार आहे.

India Vs Australia 2020 | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी हिटमॅन रोहित शर्माऐवजी 'या' खेळाडू मिळू शकते संधी
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 11:19 AM

सिडनी : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला (Team India Tour Australia 2020) आता काही तास उरले आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. एकदिवसीय आणि टी 20 मालिकेनंतर 17 डिसेंबरपासून 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. मात्र याआधी टीम इंडियाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. हिटमॅन रोहित शर्मा (Hitman Rohit Sharma) आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) या दोघांना दुखापतीमुळे पहिल्या 2 कसोटी सामन्यांना मुकावे लागले आहे. त्यामुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान कसोटी संघात (India Test Team) रोहितच्या जागेवर पहिल्या 2 सामन्यांसाठी फलंदाज श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) संधी मिळू शकते. india tour australia 2020 shreyas iyer could replace rohit sharma for test series against australia

कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) बाबा होणार असल्याने तो पहिल्या कसोटीनंतर भारतात परतणार आहे. तसेच पहिल्या 2 सामन्यात रोहित आणि इशांतही नसणार आहेत. त्यामुळे मधल्या फळीतील उणीव भरुन काढण्यासाठी टीम मॅनेजमेंट श्रेयसला कसोटी संघात स्थान देऊ शकते. श्रेयसची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी 20 मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे.

श्रेयसची क्रिकेटमधील कामगिरी

श्रेयसला कसोटीमध्ये पदार्पणाची संधी मिळाली नाहीये. श्रेयसने टीम इंडियाचे 18 एकदिवसीय आणि 22 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. श्रेयसने या 18 एकदिवसीय सामन्यात 49.86 सरासरीने 8 अर्धशतकांच्या मदतीने 748 धावा केल्या आहेत. तसेच 22 टी 20 मॅचेसमध्ये 2 अर्धशतकांसह 417 रन्स केल्या आहेत.

प्रथम श्रेणीतील कामगिरी

श्रेयसने 2014 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्णप केलं. श्रेयसने तेव्हापासून ते आतापर्यंत 54 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याने 12 शतक आणि 23 अर्धशतकांच्या मदतीसह 4 हजार 592 धावा केल्या आहेत. श्रेयसने मुंबईला रणजी करंडक जिंकून देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती.

दरम्यान टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात शुक्रवार 27 नोव्हेंबरपासून होत आहे. या दौऱ्यात प्रत्येकी 3 सामन्यांची एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळण्यात येणार आहे. तर यानंतर 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.

मालिकानिहाय वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडिलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडिलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

LPL 2020 | गुरुवारपासून रंगणार लंका प्रीमियर लीगचा थरार, टीम इंडियाचे ‘हे’ माजी खेळाडू गाजवणार मैदान

रोहित-इशांत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार? टीम इंडियाच्या डोकेदुखीत वाढ

india tour australia 2020 shreyas iyer could replace rohit sharma for test series against australia

'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.