India Tour Australia | भारताकडे धुवाँधार बोलर्स, विराट सेनाच विजयी होणार, ऑस्ट्रेलियाच्या माजी प्रशिक्षकाचा दावा

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

India Tour Australia | भारताकडे धुवाँधार बोलर्स, विराट सेनाच विजयी होणार, ऑस्ट्रेलियाच्या माजी प्रशिक्षकाचा दावा
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 12:12 AM

सिडनी : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India Tour Australia) काही दिवसांपूर्वी सिडनीमध्ये दाखल झाली आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडियाने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिका जिंकली होती. त्यामुळे यंदाही कसोटी मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा निर्धार असणार आहे. टीम इंडियाच्या ताफ्यात जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी या सासारखे वेगवान गोलंदाज भारताकडे आहेत. हे तीनही गोलंदाज मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होते. त्यामुळे टीम इंडियाला या तीनही खेळाडूंच्या अनुभवाचा फायदा होणार आहे. दरम्यान टीम इंडियाच या कसोटी मालिकेच्या विजयाची प्रबळ दावेदार आहे, असं विधान ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक डेरेन लेहमन (Darren Lehmann) यांनी केलंय. india tour australia former australia coach Darren lehmann considers india a contender for victory

काय म्हणाले लेहमन?

“टीम इंडियाच्या ताफ्यात वेगवान गोलंदाज आहेत. हे वेगवान गोलंदाजाच इंडियाला विजयाचं प्रबळ दावेदार बनवतं. टीम इंडियाचे गोलंदाज प्रतिभावान आहेत”, असं विधान लेहमन यांनी केलं.  सिडनी मॉर्निंग हेरॉलडला दिलेल्या मुलाखतीत लेहमन यांनी हे विधान केलंय. “टीम इंडिया एकमेव अशी टीम आहे, जी वेगवान गोंलदाजांसह सज्ज असते. यामुळेच टीम इंडियाचा मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विजय झाला होता. टीम इंडियाचा अपवाद वगळता इतर सर्व संघ मध्यम गतीच्या गोलंदाजांसह खेळायला येते. त्यामुळे ते ऑस्ट्रेलियात अयशस्वी होतात. ऑस्ट्रेलियात यशस्वी होण्यासाठी वेगवाग गोलंदाज हवेत. कारण ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या या वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल आहेत”, असं लेहमन म्हणाले.

टीम इंडियाचे गोलंदाज प्रतिभावान

जसप्रीत बुमराह, उमेश यादव, नवदीप सैनी आणि मोहम्मद शमी सारखे गोलंदाज 140-150 किमीच्या वेगाने गोलंदाजी करतात. या वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता या गोलंदाजांमध्ये आहे. या व्यतिरिक्त इशांत शर्माही 135 से 140 किमीच्या वेगाने गोलंदाजी करतो. यावेळेस टीम इंडियाने मोहम्हमद सिराजलाही संधी दिली आहे. सिराज 140 च्या वेगाने गोलंदाजी करणारा बोलर आहे.

बुमराहची धमाकेदार कामगिरी

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील दौऱ्यात टीम इंडियाकडून सर्वाधिक 21 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच मोहम्मद शमी आणि इशांत शर्मानेही प्रत्येकी 16 आणि 11 विकेट्स घेण्याची कामिगरी केली होती. तर फिरकीपटू रवींद्र जडेजाने 2 कसोटी सामन्यात 7 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच रवीचंद्रन आश्विन आणि कुलदीप यादव या फिरकी जोडीने एका सामन्यात अनु्क्रमे 6 आणि 5 खेळाडूंना माघारी पाठवलं होतं.

टीम इंडियाचे गोलंदाज ऑस्ट्रेलियावर वरचढ

टीम इंडियाचे गोलंदाज मागील कसोटी मालिकेत विकेट्सच्या बाबतीत वरचढ ठरले होते. टीम इंडियाच्या गोलंदाजंनी 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 70 विकेट्स घेतल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी 60 विकेट्स घेतल्या होत्या.

संबंधित बातम्या :

India Tour Australia | विराट कोहली क्रिकेट विश्वातील पावरफुल खेळाडू, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराकडून कौतुक

India Tour Australia | विराट कोहलीमुळे अ‌ॅडलेड कसोटीसाठी तिकीटांची मागणी वाढली

india tour australia former australia coach Darren lehmann considers india a contender for victory

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.