India Tour Australia | विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीम इंडियाचे खेळाडू खोडकर : वसीम अकरम

कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

India Tour Australia |  विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीम इंडियाचे खेळाडू खोडकर : वसीम अकरम
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 9:57 PM

कराची : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमाच्या समाप्तीनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour Australia) जाणार आहे. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. टी 20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या कसोटी मालिकेबद्दल पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि खेळाडू वसीम अकरम यांनी वक्तव्य केलं आहे. टीम इंडियाचे खेळाडू खोडकर झाले आहेत, असं वक्तव्य वसीम अकरमने (Wasim Akram) केलं आहे. india tour australia indian cricket player is very naughty said pakistan former captain and bowler wasim akram

नक्की काय म्हणाला अकरम?

“विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे. तो आत्मविश्वास खेळाडूंच्या बॉडी लॅंग्वेजमधून दिसून येतो. कठोर परिश्रम आणि हाव-भावावरुन त्यांच्यातील आत्मविश्वास दिसून येतो. यामुळे टीम इंडियाचे खेळाडू थोड्या प्रमाणात खोडकर झाले आहेत”, असं अकरम एका युट्युब चॅनेलवर म्हणाला.

कसोटी मालिकेत टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगतदार सामने पाहायला मिळतील. या मालिकेतील सामने चुरशीचे होतील. ऑस्ट्रेलियाकडे एकसेएक गोलंदाज आहेत. त्यामुळे कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर वरचढ ठरेल, असं वक्तव्य अकरमने केलं आहे. ऑस्ट्रेलियाकडे पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेजलवुड यासारख्या दमदार गोलंदाजांचा भरणा आहे.

वॉर्नर-स्मिथ ऑस्ट्रेलियाची जमेची बाजू

या कसोटी मालिकेत यंदा स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हि़ वॉर्नर ही खेळणार आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची बाजू आणखी मजबूत झाली आहे. तसेच खेळपट्टीही निर्णायक भूमिका बजावेल असं भाकित अकरमने व्यक्त केलं. मागील दौऱ्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका टीम इंडियाने 2-1 अशी जिंकली होती. या मालिकेत स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचा समावेश नव्हता. या दोघांनी चेंडूशी छेडछाड केल्याने या दोघांवर बंदी घालण्यात आली होती.

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

असा आहे कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज

संबंधित बातम्या :

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हिटमॅन’ संघाबाहेर

IND vs AUS : के एल राहुलचं प्रमोशन, टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची धुरा

India Tour Australia | आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाकडून संधी

india tour australia indian cricket player is very naughty said pakistan former captain and bowler wasim akram

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.