IndvsAus: ऑस्ट्रेलियाच्या 'हेड'मुळे भारताला डोकेदुखी!

अॅडलेड: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 7 बाद 191 अशी मजल मारली आहे. भारताच्या 250 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया अजून 59 धावांनी पिछाडीवर आहे. आजचा दिवस जसा भारतीय गोलंदाजांनी गाजवला, तसा ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडनेही गाजवला. एका बाजूने फलंदाजी कोसळत असताना हेडने टिच्चून फलंदाजी केली. आजचा खेळ थांबला तेव्हा हेड 61 तर …

IndvsAus: ऑस्ट्रेलियाच्या 'हेड'मुळे भारताला डोकेदुखी!

अॅडलेड: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 7 बाद 191 अशी मजल मारली आहे. भारताच्या 250 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया अजून 59 धावांनी पिछाडीवर आहे. आजचा दिवस जसा भारतीय गोलंदाजांनी गाजवला, तसा ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडनेही गाजवला. एका बाजूने फलंदाजी कोसळत असताना हेडने टिच्चून फलंदाजी केली. आजचा खेळ थांबला तेव्हा हेड 61 तर मिचेल स्टार्क 8 धावांवर खेळत आहेत. हेडच्या फलंदाजीमुळे भारताची डोकेदुखी वाढली.

दरम्यान, दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारताने 9 बाद 250 धावावरुन केली. मात्र मोहम्मद शमीला हेजलवूडने आल्या पावली माघारी धाडल्याने भारताचा पहिला डाव सर्वबाद 250 धावांत आटोपला.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर अरॉन फिंच आणि मर्कस हॅरिस फलंदाजीसाठी मैदानात उतरले. इशांत शर्माने अवघ्या तिसऱ्याच चेंडूवर फिंचच्या त्रिफळा उडवून कांगारुंना धक्का दिला. फिंच भोपळाही फोडू शकला नाही. त्यानंतर मग अश्विनने 26 धावांवर हॅरिसला माघारी धाडून दुसरा धक्का दिला. अश्विनने खेळाची सूत्रं हाती घेत मार्शला 2 धावांवर, तर उस्मान ख्वाजाला 28 धावांवर बाद करुन, ऑस्ट्रेलियाची अवस्था 4 बाद 87 अशी केली. एकीकडे फलंदाज साथ सोडत असताना दुसऱ्या बाजूने ट्रेविस हेडने खिंड लढवली. हेडने येईल त्याच्या साथीने दोन-चार धावा घेत अर्धशतक पूर्ण केलं. त्याला हॅण्ड्सकोम्बने काही काळ साथ दिली.

हॅण्डस्कोम्ब जम बसवणार असं वाटत असतानाच बुमराने त्याला 34 धावांवर बाद करत, कांगारुंचा निम्मा संघ तंबूत धाडला. कर्णधार टीम पेनला मोठी धावसंख्या करण्यात अपयश आलं. तो अवघ्या 5 धावांवर इशांत शर्माचा शिकार ठरला. त्यानंतर पॅट कमिन्सला बुमरानेच 10 धावांवर पायचित केलं.

भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक 3, बुमरा आणि इशांत शर्माने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. आता तिसऱ्या दिवशी कांगारुंचा डाव तातडीने संपवून, आघाडी मिळवण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल.

संबंधित बातम्या

ख्वाजाने हवेत उडी मारुन झेल घेतला, विराटही पाहत राहिला!  

फक्त 37 धावा केल्या, पण रोहितने आफ्रिदीचा सर्वात मोठा विक्रम मोडला  

अॅडलेड कसोटी : पुजाराच्या शतकाने भारताची लाज राखली!  

पृथ्वी शॉ पहिले दोन कसोटी सामने मुकणार 

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *