सिडनी कसोटीसाठी अश्विनची निवड, कुलदीपचंही नाव, पंड्या, ईशांत आऊट
सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना गुरुवार 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (एससीजी) खेळवण्यात येणार आहे. या कसोटीसाठी भारताच्या 13 सदस्यीय संघाची घोषणा झाली आहे. फिटनेस टेस्टमध्ये पास होऊ न शकलेल्या आर अश्विनचंही नाव या यादीत आहे. मात्र अंतिम 11 जणांमध्ये त्याचा समावेश होतो का हे गुरुवारी सकाळीच स्पष्ट होईल. या 13 जणांमध्ये […]
सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना गुरुवार 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (एससीजी) खेळवण्यात येणार आहे. या कसोटीसाठी भारताच्या 13 सदस्यीय संघाची घोषणा झाली आहे. फिटनेस टेस्टमध्ये पास होऊ न शकलेल्या आर अश्विनचंही नाव या यादीत आहे. मात्र अंतिम 11 जणांमध्ये त्याचा समावेश होतो का हे गुरुवारी सकाळीच स्पष्ट होईल. या 13 जणांमध्ये चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवचं नाव आहे. मात्ररोहित शर्माच्या जागी निवड झालेल्या हार्दिक पंड्याचा 13 जणांमध्ये समावेश नाही. भारताने मेलबर्न कसोटी जिंकून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता चौथी कसोटी जिंकून भारताला ऑस्ट्रेलियात पहिली कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे.
दरम्यान बीसीसीआयने ट्विटरवर 13 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली.
भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, आर. अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव
India name 13-man squad for SCG Test: Virat Kohli (C), A Rahane (VC), KL Rahul, Mayank Agarwal, C Pujara, H Vihari, R Pant, R Jadeja, K Yadav, R Ashwin, M Shami, Jasprit Bumrah, Umesh Yadav
A decision on R Ashwin’s availability will be taken on the morning of the Test #AUSvIND pic.twitter.com/4Lji2FExU8
— BCCI (@BCCI) January 2, 2019
आर अश्विन
दरम्यान, आर अश्विन परतला तर भारतीय संघ आणखी मजबूत होईल. अश्विनने काल थोडा सराव केला. त्याने जवळपास तासभर मैदानावर सराव केला. त्यामुळे अश्विनचा समावेश अंतिम 11 जणांमध्ये होतो का हे उद्याच कळेल. अडिलेड कसोटीवेळी अश्विनच्या स्नायू दुखावले होते. त्यामुळे तो दोन कसोटीतून बाहेर पडला होता.
सिडनी कसोटीसाठी अश्विनशिवाय फिरकीपटू कुलदीप यादवचाही अंतिम 11 जणांमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.
ईशांत शर्मा बाहेर
सिडनी कसोटीत भारतीय संघात ईशांत शर्माऐवजी उमेश यादवचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
टीम पेनने आधी पंतला डिवचलं, आता पेनच्या पत्नीचीही ‘वादात’ उडी
रोहितच्या घरी गोंडस बाळाचं आगमन, विमान पकडून हिटमॅन मुंबईकडे