स्वातंत्र्यानंतर पहिला विजय, भारताची ऑस्ट्रेलियावर 2-1 ने मात

सिडनी: विराट कोहलीच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला आहे. भारताने तब्बल 72 वर्षांनी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. चौथ्या सिडनी कसोटीत भारताचा विजय निश्चित होता, मात्र सलग अडीच दिवस पाऊस कोसळल्याने ऑस्ट्रेलिया लाजिरवाण्या पराभवापासून वाचली. सिडनी कसोटी अनिर्णित राहिली. त्यामुळे भारताने कसोटी मालिका 2-1 अशी खिशात घातली. सिडनी कसोटीत 193 धावा ठोकणाऱ्या […]

स्वातंत्र्यानंतर पहिला विजय, भारताची ऑस्ट्रेलियावर 2-1 ने मात
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

सिडनी: विराट कोहलीच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला आहे. भारताने तब्बल 72 वर्षांनी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. चौथ्या सिडनी कसोटीत भारताचा विजय निश्चित होता, मात्र सलग अडीच दिवस पाऊस कोसळल्याने ऑस्ट्रेलिया लाजिरवाण्या पराभवापासून वाचली. सिडनी कसोटी अनिर्णित राहिली. त्यामुळे भारताने कसोटी मालिका 2-1 अशी खिशात घातली.

सिडनी कसोटीत 193 धावा ठोकणाऱ्या चेतेश्वर पुजाराला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आलाच शिवाय मॅन ऑफ द सीरिजचा किताबही पुजारालाच मिळाला. पुजाराने चार कसोटी सामन्यांमध्ये तीन शतकांसह तब्बल 521 धावा ठोकल्या.

दरम्यान, चौथ्या कसोटीत भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला. भारताकडून पुजाराने 193, ऋषभ पंतने नाबाद 159, रवींद्र जाडेजा 81 आणि मयांक अग्रवालने 77 धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांत गुंडाळून भारताने ऑस्ट्रेलियावर फॉलोऑन लादला. त्यानंतर पाऊस कोसळायला सुरुवात झाल्याने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात केवळ 6 धावाच करता आल्या. मग ही कसोटी पुढे न खेळवता, पंचांनी ती अनिर्णित घोषित केली.

स्वातंत्र्यानंतर पहिला विजय

भारताने तब्बल 72 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात जाऊन भारतीय संघाने कसोटी विजय मिळवला. विराट कोहलीच्या नेतृत्त्वातील टीम इंडियाने इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद केली. या दोन्ही देशात ज्यावेळी कसोटी खेळण्यास सुरुवात झाली, तेव्हा सध्याच्या भारतीय संघातील खेळाडूंचा जन्मही झाला नव्हता.

भारताने अॅडिलेडमध्ये खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना 31 धावांनी जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतावर 146 धावांनी विजय मिळवत मालिकेत पुनरागमन केलं होतं. मग मेलबर्नमध्ये टीम इंडियाने 137 धावांनी विजय मिळवून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर चौथी सिडनी कसोटी ड्रॉ राहिल्याने भारताने ही मालिका खिशात घातली.

भारताने ऑस्ट्रेलियामध्ये पहिली कसोटी मालिका 1947 मध्ये लाला अमरनाथ यांच्या नेतृत्त्वात खेळली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने भारतावर 4-0 असा विजय मिळवला होता. भारत त्यानंतर यंदा पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकू शकला. भारताने 1947 पासून ऑस्ट्रेलियात एकूण 12 कसोटी मालिका खेळल्या आहेत. ज्यामध्ये 8 मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकल्या. तर भारताला 1980-81,1985-86,2003-04 या तीन मालिका अनिर्णित ठेवण्यात यश आलं. त्यानंतर 2018-19मध्ये भारताला पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात जाऊन विजय मिळवता आला.

ऑस्ट्रेलियात भारताने एकूण 48 कसोटी सामने खेळले. त्यापैकी केवळ 7 सामन्यांत विजय मिळाला, तर 29 सामन्यात भारताचा पराभव झाला. 12 कसोटी सामने अनिर्णित राहिले.

आतापर्यंत भारताच्या 13 कर्णधारांनी ऑस्ट्रेलिया दौरा केला, मात्र केवळ विराट कोहलीलाच कसोटी मालिका जिंकता आली. भारताने 1980-81 मध्ये सुनील गावसकर, 1985-86 मध्ये कपिल देव आणि 2003-04 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वात तीन कसोटी मालिका अनिर्णित राखण्यात यश मिळवलं होतं.

संबंधित बातम्या 

IndvsAus: अंधुक प्रकाश की रडीचा डाव, 17 षटकं आधीच खेळ थांबला!

टीम पेनने आधी पंतला डिवचलं, आता पेनच्या पत्नीचीही ‘वादात’ उडी   

रोहितच्या घरी गोंडस बाळाचं आगमन, विमान पकडून हिटमॅन मुंबईकडे   

मेलबर्न कसोटीत भारताची ऑस्ट्रेलियावर मात   

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.