मोठी बातमी : 7 वर्षांनंतर भारतीय संघ ‘या’ शेजारील देशाच्या दौऱ्यावर जाणार, पाहा रणसंग्रामाला कधी सुरुवात होणार

टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी तसंच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. (India Tour of Bangladesh In 2020 two Test Three ODI)

मोठी बातमी : 7 वर्षांनंतर भारतीय संघ 'या' शेजारील देशाच्या दौऱ्यावर जाणार, पाहा रणसंग्रामाला कधी सुरुवात होणार
भारतीय संघ 2022 ला बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे...
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 2:25 PM

मुंबई : क्रिकेटच्या मैदानातील कोरोना व्हायरसने केलेल्या एन्ट्रीने आयपीएलचा 14 वा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करावा लागला आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जातोय. 18 जून ते 23 जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंडदरम्यान (India vs New Zealand) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. अशातच भारतीय क्रिकेटशी संबंधित मोठी बातमी येतीय. टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर (India Tour of Bangladesh) जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी तसंच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. 7 वर्षानंतर भारतीय संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. (India Tour of Bangladesh In 2020 two Test Three ODI)

सात वर्षानंतर भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर

भारतीय संघाने 2014 आणि 2015 साली बांगलादेशचा दौरा केला होता. यानंतरच्या 7 वर्षात भारतीय संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर गेलेला नाही. आता 7 वर्षानंतर भारतीय संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जातो आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये भारताचा बांगलादेश दौरा प्रस्तावित आहे. 2015 साली भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळला होता.

बांगलादेशचा 2019 साली भारत दौरा

2015 पासून बांगलादेश संघाने दोनदा भारत दौरा केला आहे. 2017 मध्ये बांगलादेशचा संघ एक कसोटी सामना खेळण्यासाठी भारतात आला. त्यानंतर 2019 मध्ये दोन कसोटी सामने आणि तीन टी -20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी बांगलादेशचा संघ भारतात आला होता. यापैकी एक कसोटी कोलकाताच्या ईडन गार्डन येथे खेळली गेली होती, ही भारताची पहिली गुलाबी बॉल कसोटी होती. ही कसोटी मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा देखील भाग होती.

बांगलादेशचा ऑस्ट्रेलिया दौरा

ईएसपीएनच्या रिपोर्टनुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने 2021 ते 2023 या काळात क्रिकेट सामन्यांचे प्रसारण हक्क विकले आहेत. यावर्षी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ बांगलादेशचाही दौरा करेल. तिथे बांगलादेशला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका खेळायची आहे. मात्र, अद्याप दौऱ्याचे वेळापत्रक ठरलेले नाही.

या टीमही बांगलादेश दौरा करणार

आयसीसी टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या अगोदर इंग्लंडचा संघ टी -२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेशचा दौरा करणार आहे. या व्यतिरिक्त न्यूझीलंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडीजचा संघ जानेवारी 2023 पर्यंत बांगलादेश दौर्‍यावर जाण्याचा प्रस्ताव आहे.

(India Tour of Bangladesh In 2020 two Test Three ODI)

हे ही वाचा :

न्यूझीलंडच्या बोलर्सचा चक्रव्यूह भेदायचाय, विराट या आग ओकणाऱ्या बोलर्सला घेऊन चाललाय!

Sushil Kumar चा पाय खोलात, अटकेपासून वाचण्यासाठी कोर्टात धाव, पोलिसांकडून एक लाखाचं बक्षीस

इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा दिलासा, भारतीय संघाचा दिग्गज कोरोनाविरुद्धची मॅच जिंकला!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.