इंग्लंड दौऱ्यावर जायचंय? कोरोना चाचण्या निगेटिव्ह येणं आवश्यक, अन्यथा निवड होऊनही डच्चू, BCCI चे कडक नियम

टीम इंडिया (Team India) इंग्लंड दौऱ्यावर (India Tour England 2021) जाणार आहे. यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी दोन हात करणार आहे.

इंग्लंड दौऱ्यावर जायचंय? कोरोना चाचण्या निगेटिव्ह येणं आवश्यक, अन्यथा निवड होऊनही डच्चू, BCCI चे कडक नियम
कसोटी क्रिकेटचा विश्वचषक मानला जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship)भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) अप्रतिम कामगिरी करत अंतिम सामन्यापर्यंत झेप घेतली आहे. दरम्यान या कामगिरीसह भारतीय खेळाडूंनी आणखी एक अप्रतिम कामगिरी केली असून WTC मध्ये सर्वाधिक दुहेरी शतकं झळकावण्यात भारतीय खेळाडू पुढे आहेत. (Virat Kohlis Team India Only Team to Score 4 Double Centuries in World Test Championship)
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 8:28 PM

मुंबई : टीम इंडिया (Team India) लवकरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (ICC World Test Championship Final 2021) आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी India tour of England इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया अंजिक्यपदासाठी न्यूझीलंड विरुद्ध अंतिम साम्नयात दोन हात करणार आहे. तर त्यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

या इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया काही दिवसात रवाना होणार आहे. यासाठी सर्व खेळाडू मुंबईला एकत्र जमणार आहेत. त्याआधी बीसीसीआयने (BCCI) या दौऱ्यासाठी एक फूलप्रूफ प्लॅन तयार केला आहे. (India Tour Of England : Team To Quarantine For 2 Weeks In Mumbai, player have to do 3 RT-PCR Test for Covid-19)

काय आहे प्लॅन?

बीसीसीआयच्या या प्लॅनाबाबतची माहिती एएनआयच्या सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार, सर्व खेळाडू 19 मे ला मुंबईत जमतील. मात्र त्या खेळाडूंना 3 वेळा (RT-PCR tests) आरटी-पीसीआर चाचण्या करणं बंधनकारक असणार आहे. “खेळाडूंना या तीनही कोरोना चाचण्या त्यांच्या घरीच करायच्या आहेत. कोरोना रिपोर्ट नेगिटिव्ह आला तरच खेळाडूंना मुंबईच्या दिशेने येता येणार आहे. मुंबईत आल्यानंतर हे खेळाडू 14 दिवस क्वारंटाईन राहतील. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंडसाठी रवाना होईल”.

दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस हा इंग्लंड दौऱ्यादरम्यान घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईत दाखल झालेल्या खेळाडूंना दोन आठवड्यांसाठी कडक नियमांसह विलगीकरण कक्षात ठेवलं जाईल.

चूक झाल्यास शिक्षा

कोरोनामुळे आयपीएल 2021 पुढे ढकलावं लागलं, तेव्हापासून सर्व भारतीय खेळाडू आपापल्या घरी आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आपल्या घरून मुंबई गाठावी लागेल.19 मे ला मुंबईत दाखल झालेल्या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली पाहिजे, अशा कडक सूचना मंडळाने दिल्या आहेत. ज्या खेळाडूंची चाचणी पॉझिटिव्ह येईल, त्यांचा पुढील दौरा रद्द होईल, या खेळाडूंना परत त्यांची चाचणी निगेटिव्ह आली तरी बीसीसीआय इंग्लंडला पाठवणार नाही. त्यांना तिथूनच घरी परतावं लागेल.

जाडेजा आणि हनुमा विहारीचं पुनरागमन

या दौऱ्यासाठी काही दिवसांपूर्वी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. यामध्ये अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा आणि हनुमा विहारीचं पुनरागमन झालं आहे. बीसीसीआयने एकूण 4 राखीव खेळाडूंसह 24 सदस्यीय संघाची घोषणा केली. राखीव खेळाडूंमध्ये अभिमन्यु इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जन नागवासवाला या युवा खेळाडूंना संधी दिली आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 18 ते 23 जून, साउथ्मपटन

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट
  • दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट
  • तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट
  • चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर
  • पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव,

संबंधित बातम्या :

ICC World Test Championship Final | आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 फायनल आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

PHOTO | बॅटिंगने गोलंदाजांना शॉक दिला, वर्ल्ड कप विजयाचा हिरो ठरला, टीम इंडियाच्या इलेक्ट्रिकल इंजीनियरची गोष्ट

(India Tour Of England : Team To Quarantine For 2 Weeks In Mumbai, player have to do 3 RT-PCR Test for Covid-19)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.