विंडीज दौऱ्यासाठी कोहली उपलब्ध, रोहितकडे कर्णधारपद जाण्याच्या भीतीने निर्णय?
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा शुक्रवारी करण्यात येणार आहे. येत्या 3 ऑगस्टपासून भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत तीन टी 20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.
मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा शुक्रवारी करण्यात येणार आहे. येत्या 3 ऑगस्टपासून भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत तीन टी 20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.
विश्वचषकातील पराभवानंतर भारतीय संघाचा हा पहिलाच परदेश दौरा असेल. या दौऱ्यासाठी अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आता अनेक खेळाडूंनी आपण खेळण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. यापूर्वी कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना विंडीज दौऱ्यात विश्रांती देण्यात येईल असं म्हटलं जात होतं. मात्र आता विराट कोहलीने या दौऱ्यात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
विराट कोहलीसह रोहित शर्माही या दौऱ्यावर जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकेटकीपर फलंदाज महेंद्रसिंह धोनीला पुढील दोन महिन्यांसाठी विश्रांती देण्यात येणार आहे. तर अष्टपैलू हार्दिक पंड्या पाठदुखीने त्रस्त आहे.
कोहलीला कर्णधारपद जाण्याची भीती?
विंडीज दौऱ्यात कोहलीला विश्रांती देण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र आता त्याने स्वत:हून आपण उपलब्ध असल्याचं सांगितलं. त्यामुळे कोहलीला कर्णधारपद जाण्याची भीती तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण विश्वचषकातील पराभवानंतर कोहलीकडे केवळ कसोटी कर्णधारपद ठेवून, वन डे आणि टी 20 संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळेच तर कोहलीने आपण विंडीज दौऱ्यात खेळणार असल्याचं म्हटलं नाही ना असा प्रश्न आहे.
वाचा : वर्ल्डकप पराभवानंतर कोहलीचे पंख छाटण्याची तयारी, रोहित शर्मा नवा कर्णधार?
युवा खेळाडूंना संधी
दरम्यान, या विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये सलामीवीर पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, मयांक अग्रवाल, ऋषभ पंत आणि खलील अहमद यांना संधी मिळण्याची चिन्हं आहेत.
वेस्ट इंडिज दौरा, पृथ्वी शॉसह या चौघांची निवड निश्चित?
भारत वि वेस्ट इंडिज वेळापत्रक
- 3 ऑगस्ट – पहिला T20 सामना
- 4 ऑगस्ट – दुसरा T20 सामना
- 6 ऑगस्ट – तिसरा T20 सामना
- 8 ऑगस्ट – पहिला वन डे सामना
- 11 ऑगस्ट – दुसरा वन डे सामना
- 14 ऑगस्ट – तिसरा वन डे सामना
- 22 ते 26 ऑगस्ट – पहिली कसोटी
- 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर – दुसरी कसोटी
संबंधित बातम्या
वेस्ट इंडिज दौरा, पृथ्वी शॉसह या चौघांची निवड निश्चित?
आयसीसीच्या विश्वचषक संघात विराट कोहलीलाही स्थान नाही, फक्त दोन भारतीय नावं
विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यात विराट कोहली कायम फ्लॉप
वर्ल्डकप पराभवानंतर कोहलीचे पंख छाटण्याची तयारी, रोहित शर्मा नवा कर्णधार?