India Tour Sri Lanka 2021 | टीम इंडियाचे ‘हे’ 20 युवा शिलेदार श्रीलंकेत मैदान मारणार?

टीम इंडिया (Team india) जुलै महिन्यात एकदिवसीय आणि टी 20 मालिकेसाठी ( Tour sri lanka) श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.

India Tour Sri Lanka 2021 | टीम इंडियाचे 'हे' 20 युवा शिलेदार श्रीलंकेत मैदान मारणार?
Team India
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 5:36 PM

मुंबई : टीम इंडियाची (Team India) इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. टीम इंडियाचे 24 खेळाडू या 87 दिवसांच्या इंग्लंड दौऱ्यासाठी 2 जून रवाना होणार आहे. टीम इंडियाचे शिलेदार इंग्लंड विरुद्ध भिडण्यासाठी तयार आहेत. तर दुसऱ्या बाजूला युवा शिलेदार हे श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. (Sri Lanka Tour) याबाबतची माहिती काही दिवसांपूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिली. या श्रीलंका दौऱ्यासाठी युवा ब्रिगेड 5 जुलैला (Team India for Sri Lanka)कोलंबोलो पोहचतील. श्रीलंका विरुद्ध भारतीय संघ प्रत्येकी 3 वनडे आणि टी 20 सामने खेळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार या एकूण 6 सामन्यांसाठी भारतीय संघ 14 दिवस श्रीलंकेत थांबेल. तसेच 18 खेळाडूंची निवड करण्यात येऊ शकते. (india tour sri lanka 2021 for bcci will be announced odi and t 20 i series to 20 players squad)

या श्रीलंका दौऱ्यासाठी कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार, कर्णधार म्हणून कोणाला जबाबादारी मिळणार, हे आपण या निमित्ताने जाणून घेणार आहोत.

सलामीवीर म्हणून पृथ्वी, धवन आणि पडीक्कल

या दौऱ्यातील वनडे आणि टी 20 मालिकेसाठी सलामीवीर म्हणून (Prithvi Shaw) पृथ्वी शॉ, शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि देवदत्त पडीक्कल यांना संधी मिळू शकते. या तिन्ही फलंदाजांनी आयपीएलच्या 14 व्या मोसमात स्थगितीपर्यंत धमाकेदार कामगिरी केली. तसेच पृथ्वी आणि देवदत्तने चमकदार फलंदाजी केली होती. त्यामुळे हे तिन्ही फलंदाजांनी सलामीवीरासाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे.

मधल्या फळीची जबाबदारी कोणाला?

ओपनिंग जोडीनंतर प्रश्न येतो तो मधल्या फळीचा. या मीडल ऑर्डरमधील फलंदाजांवर महत्वाची जबाबदारी असते. या मीडल ऑर्डरसाठी मुंबईकर सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सॅमसन, मनीष पांडे आणि ऋतुराज गायकवाड यांना पसंती मिळू शकते. या सर्व नव्या दमाच्या फलंदाजांनी आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामिगिरी केली आहे. टी 20 सीरिजसाठी मनिष आणि ऋतुराजला संधी मिळू शकते. तसेच विकेटकीपर बॅट्समन इशान किशन आणि संजू सॅमसन या दोघांना या दोन्ही मालिकांमध्ये संधी मिळू शकते.

अष्टपैलू खेळाडू

श्रीलंके विरुद्ध दोन हात करण्यासाठी टीम इंडिया या दौऱ्यावर 3 ऑलराऊंडर खेळाडूंसोबत जाऊ शकते. या 3 अष्टपैलू खेळाडूंमध्ये 2 वेगवान गोलंदाज आहेत. यात हार्दिक पंड्या आणि शिवम दुबेचा समावेश आहे. तर स्पिन ऑलराऊंडर म्हणून कृणाल पंड्याचा समावेश आगहे.

वेगवान गोलंदाजीची धुरा

भारताच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी ही भुवनेश्वर कुमार, कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, खलील अहमद, चेतन साकरिया यांच्या खांद्यावर असणार आहे. साकरियाने आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने अनेकांचे लक्ष वेधले होते. तसेच दीपर चाहरकडे स्विंग करण्याची कला आहे. सैनीकडे वेगाने गोलंदाजीची करण्याची क्षमता आहे. तर खलील अहमदकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

फिरकीची जबाबदारी कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, राहुल चाहर आणि वरुण चक्रवर्ती यांच्या खांद्यावर असेल. श्रीलंका आणि भारतातील खेळपट्ट्यांमध्ये साम्य आहे. त्यामुळे या फिरकी गोलंदाजांना पीचकडून मदत मिळू शकते.

संबंधित बातम्या :

India tour of Sri Lanka 2021 | सामने कधी आणि कुठे? प्रशिक्षक कोण? राहुल द्रविडची भूमिका काय? जाणून घ्या सर्वकाही

India tour of Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यावर पारस महांब्रे प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळण्याची चिन्हं, संपूर्ण दौरा कसा असेल?

(india tour sri lanka 2021 for bcci will be announced odi and t 20 i series to 20 players squad)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.