India vs Afghanistan : आचार संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी विराट कोहलीला दंड, खात्यात डिमेरिट पॉईंटही जोडला
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीवर आयसीसीच्या आचार संहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, कुठल्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात अनावश्यक अपील करणे म्हणजे नियमाचं उल्लंघन करणे आहे. याअंतर्गत विराट कोहलीवर सामन्याच्या शुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
लंडन : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीवर आयसीसीच्या आचार संहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, कुठल्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात अनावश्यक अपील करणे म्हणजे नियमाचं उल्लंघन करणे आहे. याअंतर्गत विराट कोहलीवर सामन्याच्या शुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
आयसीसीने रविवारी याबाबत अधिकृतरित्या जाहीर केलं. विराट कोहली हा आचार संहिता उल्लंघनाच्या लेव्हल-1 चा दोषी आहे, असं आयसीससीने सांगितलं. आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये 23 जूनला शनिवारी भारत विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना रंगला. या सामन्यात भारताने 11 धावांनी अफगाणिस्तानवर विजय मिळवला.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. अटीतटीच्या सामन्यात 29 व्या षटकात कोहलीने अंपायर अलीम डार यांच्याजवळ जाऊन आक्रमकरित्या आणि चुकिच्या पद्धतीने एलबीडब्ल्यूची अपील केली होती. यामुळे कोहलीने आयसीसीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केलं, असं आयसीससीने सांगितलं.
या प्रकरणी कोहलीनेही त्याची चूक कबूल केली. त्याने दंडही स्वीकारला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील सुनवाईची गरज नाही. दंडाव्यतिरिक्त या घटनेनंतर आयसीसीने कोहलीच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंटही जोडला आहे. सप्टेंबर 2016 मध्ये रिवाइज्ड कोड लागू झाल्यानंतर कोहलीची ही दुसरी चूक आहे.
सध्या कोहलीच्या खात्यात दोन डिमेरिट पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट त्याला जानेवारी 2018 मध्ये दक्षिण अफ्रिकेसोबत झालेल्या टेस्ट सामन्यादरम्यान मिळाला होता.
दरम्यान सोशल मीडियावर मात्र अनेकांनी हा प्रसंग मोठ्या प्रमाणात व्हायरल केला. इतकंच नाही तर यावर अनेक मीम्सही सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत.
Out dede bhai. Afghanistan se haarenge toh bohot beizzati hogi. #IndvAfg pic.twitter.com/ag7cOlNbIQ
— Sagar (@sagarcasm) June 22, 2019
dhoni se thodi umpiring seekh lo please. #INDvAFG #CWC19 pic.twitter.com/65pDyb04Ld
— d J ? (@djaywalebabu) June 22, 2019
#INDvAFG pic.twitter.com/4bhYafnUGi
— Rishabh Srivastava (@AskRishabh) June 22, 2019
Me on the last day or exam vs me on the result day #INDvAFG #CWC19 pic.twitter.com/c7pQxRh8VO
— sweety (@piggy_chopps) June 22, 2019
Students in college for attendance#CWC19 #Kohli #INDvAFG pic.twitter.com/KVkgrNIu3M
— Sachin | सचिन (@Subtle_Sachin) June 22, 2019
when when mom scolds dad scolds#INDvAFG #CWC19 pic.twitter.com/n1QNIWLoC2
— d J ? (@djaywalebabu) June 22, 2019
*Back benchers to professor*
Pic 1 : Normal days Pic 2 : During Exams time#INDvAFG pic.twitter.com/IOQeXprq63
— Tweetera? (@DoctorrSays) June 22, 2019
संबंधित बातम्या :
एकीकडे विश्वचषकाची धामधूम, दुसरीकडे भारताच्या वेगवान गोलंदाजाचा क्रिकेटला अलविदा
न्यूझीलंडने सामना जिंकला आणि वेस्ट इंडिजने मनं
मोहम्मद शमीची हॅटट्रिक आणि भारताचा विजय, शेवटच्या षटकाचा थरार
भारत हा जगातला सर्वोकृष्ट संघ, अफगाणिस्तानच्या कर्णधाराकडून कौतुक