Ind Vs Aus 2020 | गौतम गंभीर म्हणतो, ‘हा’ खेळाडू अर्धा फिट पण काय करणार टीमकडे दुसरा पर्याय नाही!

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या अर्धा फिट आहे पण अशाही परिस्थितीत भारतीय संघाकडे दुसरा पर्याय नाही, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे.

Ind Vs Aus 2020 | गौतम गंभीर म्हणतो, 'हा' खेळाडू अर्धा फिट पण काय करणार टीमकडे दुसरा पर्याय नाही!
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 8:18 AM

सिडनी :  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Vs AUS 2020) पहिल्या एकदिवसीय मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने सर्वच आघाड्यांवर सरस कामगिरी केली. त्याच्या बळावर कांगारुंनी पहिला एकदिवसीय सामना 66 धावांनी जिंकला. या पराभवानंतर भारताचा सहावा बोलर्स कोण किंवा पार्टटाईम बोलिंगसाठी भारताचा पर्याय कोण, याची गरमागरम चर्चा सुरु झाली आहे. अशातच भारताचा माजी खेळाडू गौतमने ‘गंभीर’ (Gautam Gambhir) मत व्यक्त केलं आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अर्धा फिट आहे पण अशाही परिस्थितीत भारतीय संघाकडे दुसरा पर्याय नाही, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे. (India Vs Aus Gautam Gambhir Call Hardik Pandya half fit)

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ 5 बोलर्ससोबत मैदानात उतरला. निर्धारित 50 षटकं याच 5 बोलर्सला टाकावी लागली. संघात असा कुणी ऑलराऊंड प्लेअर नव्हता की जो सहाव्या बोलर्सची कमी भरुन काढेल. शुक्रवारी सहाव्या गोलंदाजाची कमी भारतीय संघाला प्रकर्षाने जाणवली. सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने देखील सहाव्या बोलर्सची कमी जाणवल्याचं मान्य केलं.

मुख्य बोलर्सने जर मार खाल्ला तर सहावा बोलर्सचा किंवा पार्टटाईम बोलर्सचा कर्णधार विचार करतो. मात्र पहिल्या वनडेमध्ये असा विचार करायला विराट कोहलीजवळ पर्यायच नव्हता. मागील वर्षापासून पाठीच्या आजारामुळे हार्दिक बोलिंग करु शकत नाही. संपूर्ण आयपीएलच्या हंगामात त्याने मुंबईकडून केवळ बॅटिंग केली. सध्या तो त्याच्या बोलिंग अ‌ॅक्शनवर तसंच बोलिंग स्पीडवर काम करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हार्दिकच्या बोलिंगची उणीव भासल्याचं स्वत: कर्णधार कोहलीने मान्य केलं.

टीममध्ये सहावा बोलर्स कोण?

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्यापासून टीममध्ये ऑलराऊंडर प्लेअरविषयी जोरदार चर्चा होत आहे. भारताच्या पहिल्या पराभवानंतर या चर्चेने आता अधिकच जोर धरला आहे. ‘2019 च्या वर्ल्डकपनंतर भारतीय संघात संतुलन असल्याचं दिसत नाही. गेल्या वर्षभरात भारतीय संघात असमतोल दिसत आहे. हार्दिक जर बोलिंग करत नाही तर मग टीम इंडियाकडे सहावा बोलर्स कोण?’, असा सवाल गंभीरने उपस्थित केला.

विजय शंकरचं खराब प्रदर्शन

2019 वर्ल्डकपमध्ये सामिल असलेला खेळाडू विजय शंकर (VIjay Shankar) एका टूर्नामेंटदरम्यान दुखापतीमुळे संघाबाहेर गेला होता. त्यानंतर आतापर्यंत त्याने संघात पुनरागमन केलं नाही. गंभीरच्या म्हणण्यानुसार ‘जरी विजय शंकर संघात सामिल असता तरीही म्हणावा असा फरक पडला नसता. जरी विजय शंकरकडे पर्याय म्हणून पाहिलं तरी तो पाचव्या किंवा सहाव्या नंबरला बॅटिंग करु शकतो किंवा 7 ते 8 ओव्हर्स टाकू शकतो?’, असे सवाल गौतम गंभीरने उपस्थित केले.

(India Vs Aus Gautam Gambhir Call Hardik Pandya half fit)

संबंधित बातम्या

हार्दिक पांड्याचा टीम इंडिया आणि कर्णधार कोहलीला मोठा धक्का, म्हणाला, ‘दुसरा ऑलराऊंडर शोधा’

IND vs AUS : इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धचा प्रत्येक सामना हरणार; सांगितलं कारण

India vs Australia 1st ODI Live Score update : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची कमाल, भारताचा 66 धावांनी पराभव

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.