India vs Australia 1st T20 : बॅटिंगदरम्यान हेल्मेटवर चेंडू आदळला, रवींद्र जडेजा मैदानाबाहेर, टीम इंडियाच्या अडचणीत वाढ
जडेजाने 23 चेंडूत 5 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने तडाखेदार नाबाद 44 धावा केल्या.
कॅनबेरा : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या सामन्यातून बाहेर झाला आहे. बॅटिंगदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे जडेजाला या सामन्याला मुकावे लागले आहे. या पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडिया बॅटिंग करत होती. या बॅटिंगदरम्यान जडेजाच्या हेल्मेटवर येऊन चेंडू आदळला. यामुळे जडेजाला मैदानाबाहेर जावं लागलं. हा सर्व प्रकार शेवटच्या म्हणजेच 20 व्या ओव्हरमध्ये घडला. India vs Australia 1st T20 Ravindra Jadeja was hit on the helmet in the final over of the first innings of the first T 20
UPDATE: Ravindra Jadeja was hit on the helmet in the final over of the first innings of the first T20I.
Yuzvendra Chahal will take the field in the 2nd innings as a concussion substitute. Jadeja is currently being assessed by the BCCI Medical Team. #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/tdzZrHpA1H
— BCCI (@BCCI) December 4, 2020
पहिल्या डावातील शेवटची ओव्हर मिचेल स्टार्क (Mitchell Starc) टाकत होता. मिचेलने टाकलेला चेंडू जडेजाच्या हेल्मेटवर येऊन आदळला. जडेजाला सुदैवाने यात कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. जडेजाची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. जडेजावर वैद्यकीय पथक लक्ष देऊन आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.
यामुळे जडेजाच्या जागी कन्कशन नियमांनुसार (Concussion Substitute) युजवेंद्र चहलला सब्स्टिट्यूट (बदली खेळाडू) म्हणून संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता जडेजाऐवजी चहल गोलंदाजी टाकतोय.
जडेजाची धमाकेदार खेळी
जडेजाने टीम इंडियासाठी अखेरच्या काही षटकांमध्ये तडाखेदार खेळी केली. टीम इंडियाने फटाफट विकेट्स गमावल्याने 150 धावा होतील की नाही, याबाबत अनिश्चितता होती. मात्र जडेजाच्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाला सन्मानजनक धावा करता आल्या. जडेजाने 23 चेंडूत 5 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने तडाखेदार नाबाद 44 धावा केल्या.
संबंधित बातम्या :
India vs Australia 1st T20 Ravindra Jadeja was hit on the helmet in the final over of the first innings of the first T 20