India vs Australia 2020 | सलग 2 पराभव, तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता

ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

India vs Australia 2020 | सलग 2 पराभव, तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 11:14 AM

कॅनबेरा : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात (India Tour Australia 2020-21) तिसरा एकदिवसीय सामना बुधवारी 2 डिसेंबरला (Aus Vs IND 3rd ODI) खेळण्यात येणार आहे. याआधीच्या 2 सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने यासह मालिकाही जिंकली आहे. कांगारुंनी 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या दोन्ही सामन्यात टीम इंडियाचे गोलंदाज अपयशी ठरले. कांगारुंच्या सलामी तसेच मधल्या फळीतील फलंदाजांना रोखण्यास भारतीय फलंदाजांना यश आले नाही. दरम्यान तिसरा आणि शेवटचा सामना टीम इंडियासाठी प्रतिष्ठेचा असणार आहे. हा शेवटचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असेल. या सामन्यासाठी टीम इंडियात काही बदल केले जाणार असल्याची चर्चा आहे. india vs australia 2020 2 defeats in a row big change in team india for the 3rd odi match

भारतीय गोलंदाज अपयशी

पहिल्या दोन सामन्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) टीम इंडियाच्या गोलंदाजीचा कणा आहे. मात्र बुमराहदेखील अपयशी ठरला. बुमराहने पहिल्या सामन्यात 10 ओव्हरमध्ये 73 धावा दिल्या. तर दुसऱ्या सामन्यातील 10 ओव्हरमध्येही 79 धावा लुटवल्या. तसेच नवदीप सैनीला (Navdeep Saini) आयपीएलमधील (IPL 2020) दमदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी देण्यात आली. मात्र सैनीला आयपीएलसारखी कामगिरी करता आली नाही. टीम इंडियाकडे सध्या राखीव खेळाडूंमध्ये वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur), थंगारासू नटराजन (Thangarasu Natarajan) आणि फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यासारखे एकूण 3 गोलंदाज आहेत. या तिघांना तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकते.

बुमराह टीम इंडियाचा महत्वाचा गोलंदाज आहे. त्यामुळे त्याला तिसऱ्या सामन्यासाठी वगळता येणार नाही. या सामन्यासाठी मोहम्मद शमीच्या जागेवर शार्दुल ठाकूर तर सैनीच्या जागेवर थंगारासू नटराजनला संधी मिळू शकते. तसेच कुलदीपला युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) जागी समाविष्ट केले जाऊ शकते.

मयंक अग्रवालला वगळणार?

या तिसऱ्या सामन्यासाठी सलामीवीर मयंक अग्रवालला विश्रांती देण्यात येऊ शकते. जर असं झालं तर केएल राहुलला सलामी करण्याची संधी मिळू शकते. केएलला आयपीएलमध्ये सलामी करण्याचा अनुभव आहे.

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | विराटवर कर्णधार पदाचा कोणताही दबाव नाही, सलग दुसऱ्या पराभवानंतर टीकेचा धनी झालेल्या कोहलीची हरभजनकडून पाठराखण

India vs Australia 2020 | अय्यरची निर्णायक विकेट, कोहलीचा अफलातून कॅच, हेनरिक्सने मॅच फिरवली

india vs australia 2020 2 defeats in a row big change in team india for the 3rd odi match

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.