सिडनी : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Tour Australia 2020-21) यांच्यात 27 नोव्हेंबरला पहिला एकदिवसीय सामना खेळण्यात आला. या पहिल्या सामन्यात टीम इंडियाची पराभवाने सुरुवात झाली. तर ऑस्ट्रेलियाने विजयी सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 375 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाला निर्धारित 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 308 धावाच करता आल्या. टीम इंडियाकडून शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) झुंजार खेळी केली. शिखर धवनने 86 चेंडूत 74 धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने 76 चेंडूत 7 फोर आणि 4 सिक्ससह 90 धावांची तडाखेदार खेळी केली. या खेळीसह हार्दिकने विक्रमाला गवसणी घातली आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज ठरला आहे. india vs australia 2020-21 hardik pandya became the first batsman from team india to score the fastest 1000 runs in odi
9️⃣0️⃣ runs
7️⃣6️⃣ balls
7️⃣ boundaries
4️⃣ sixesWell played Hardik Pandya ??? #TeamIndia #AUSvIND
Scorecard: https://t.co/Qha4EHPtSf pic.twitter.com/XS4tqaGT3s
— BCCI (@BCCI) November 27, 2020
हार्दिकने 48 धावा करताच या विक्रमाला गवसणी घातली. हार्दिक टीम इंडियाकडून एकदिवसीय सामन्यात वेगवान 1 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. हार्दिकने टीम इंडियाकडून सर्वात कमी चेंडूत 1 हजार धावा केल्या. हार्दिकने 857 चेंडूत ही कामगिरी केली आहे. हार्दिकने केदार जाधवचा विक्रम मोडित काढला आहे. केदारने 937 चेंडूत 1 हजार धावा करण्याची कामगिरी केली होती.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान हजार धावा करण्याचा रेकॉर्ड विंडिजच्या आंद्रे रसेलच्या नावे आहे. रसेलने चक्क 767 चेंडूत 1 हजार धावा करण्याची कामगिरी केली आहे.
आतापर्यंत आपण कमी चेंडूत 1 हजार धावा करणाऱ्या खेळाडूंची माहिती घेतली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये 1 हजार धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. पाकिस्तानचा ओपनर फखर जमानने सर्वात कमी डावात 1 हजार धावा करण्याची किमया केली आहे. फखरने 18 डावात ही कामगिरी केली आहे.
3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाची या मालिकेत 0-1 अशी पिछाडी झाली आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी करो या मरोची स्थिती आहे. टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणं बंधनकारक असणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना रविवार 29 नोव्हेंबरला सिडनीत खेळण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
हार्दिक पांड्याचा टीम इंडिया आणि कर्णधार कोहलीला मोठा धक्का, म्हणाला, ‘दुसरा ऑलराऊंडर शोधा’
india vs australia 2020-21 hardik pandya became the first batsman from team india to score the fastest 1000 runs in odi