AUS vs IND, 2nd Test 4th Day : टीम इंडियाचा दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सने शानदार विजय
ऑस्ट्रेलियाची संपूर्ण टीम 200 रन्सवर ऑलआऊट झाली आहे. त्यामुळे भारताला मेलबर्न कसोटी जिंकण्यासाठी केवळ 70 रन्सची गरज आहे.
मेलबर्न : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर (Australia vs india 2nd test)दुसऱ्या कसोटीत 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 70 धावांचे माफक आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान टीम इंडियाने 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह टीम इंडियाने कसोटी मालिकेत 1-1 बरोबरी केली आहे. (india vs australia 2020 2nd test day 4 live cricket score updates online in marathi at mcg)
बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाचा विजय
2nd Test. It's all over! India won by 8 wickets https://t.co/HL6BBEW6uY #AUSvIND
— BCCI (@BCCI) December 29, 2020
टीम इंडिया विजयी आव्हानाचं पाठलाग करण्यासाठी मैदानात आली. टीम इंडियाची सावध सुरुवात झाली. 16 धावांवर टीम इंडियाने पहिली विकेट गमावली. मयंक अग्रवाल 5 धावांवर बाद झाला. अग्रवालमागे चेतेश्वर पुजाराही आऊट झाला. पुजाराने 3 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाची 19-2 अशी स्थिती झाली. मात्र यानंतर शुभमन गिल आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने 51 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. यासह टीम इंडियाला विजय मिळवून दिला. अजिंक्य रहाणेने नाबाद 27 तर शुभमन गिलने नाबाद 35 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी 1 विकेट घेतला.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंना दुसऱ्या डावात 200 धावांवर रोखले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून कॅमरॉन ग्रीनने सर्वाधिक 45 धावा केल्या. तर सलामीवीर मॅथ्यू वेडने 40 धावा केल्या. तर पॅट कमिन्सने 22 धावांची झुंजार खेळी केली. टीम इंडियाने कांगारुंना सुरुवातीपासून झटके दिले. ऑस्ट्रेलियाने एकामागोमाग एक विकेट टाकले. यामुळे कांगारुंची 99-6 अशी स्थिती झाली. मात्र यानंतर कॅमरॉन ग्रीन आणि पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. मात्र यानंतर टीम इंडियाने कांगारुंना एकामागोमाग एक धक्के दिले. टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर रवींद्र जाडेजा, आर अश्विन आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या. तर उमेश यादवने 1 बळी टिपला.
टीम इंडियाचा पहिला डाव
टीम इंडियाच्या पहिल्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. मयंक अग्रवाल शून्यावर बाद झाला. मात्र यानंतर चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 61 धावा जोडल्या. यानंतर गिल 45 धावांवर बाद झाला. गिल पाठोपाठ चेतेश्वर पुजाराही 17 धावांची खेळी केली. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने हनुमा विहारी आणि रिषभ पंतसह अर्धशतकी भागीदारी केली. तर यानंतर रवींद्र जाडेजासह 121 धावांची शतकी भागीदारी केली. या भागीदारीमुळे कांगारुंवर वरचढ ठरली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 191 धावा केल्या. या जोडीच्या भागीदारीमुळे टीम इंडियाने 191 धावांचा टप्पा सहज पार केला. टीम इंडियाकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 112 धावांची शतकी खेळी केली. तर रवींद्र जाडेजाने 57 रन्स केल्या. टीम इंडियाने दुसऱ्या डावात सर्वबाद 326 धावा केल्या. यामुळे टीम इंडियाला 131 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली.
कांगारुंचा पहिला डाव
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी पहिल्या डावातह कांगारुंना हात खोलून दिले नाही. टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना फार वेळ मैदानात टिकता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात मार्नस लाबुशानेने 48 तर ट्रॅव्हिस हेडने 38 धावा केल्या. कांगारुंचा पहिला डाव 195 धावांवर आटोपला. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने 2 विकेट्स मिळवल्या. तर रवींद्र जाडेजाने 1 बळी टिपला.
(india vs australia 2020 2nd test day 4 live cricket score updates online in marathi at mcg)
LIVE NEWS & UPDATES
-
ऑस्ट्रेलियाची तिसऱ्या कसोटी सामन्यावर पकड
तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आतापर्यंत ऑस्ट्रेलियन संघाने पकड मिळवली आहे. सकाळच्या सत्रात आतापर्यंत टीम इंडियाला केवळ एकच बळी मिळवता आला आहे. कालच्या 2 बाद 166 धावसंख्येवरुन सामन्याला सुरुवात करणाऱ्या कांगारुंनी आतापर्यंत 3 बाद 230 अशी मजल मारली आहे.
-
कर्णधार अजिंक्य रहाणे ‘मॅन ऑफ द मॅच’
रहाणेने पहिल्या डावात शानदार शतक लगावलं. तसेच दुसऱ्या डावातही नाबाद 27 धावा केल्या. या कामगिरीसाठी अजिंक्यला सामनावीर पुरस्कारने गौरवण्यात आले. अजिंक्यला जॉन मुलघ या पदकाने सन्मानित केलं गेलं.
रहाणेला सामानावीर म्हणून मिळालेलं जॉन मुलघ मेडल
The proud recipient and the inaugural winner of the Mullagh Medal – #TeamIndia Captain @ajinkyarahane88 #AUSvIND pic.twitter.com/0cBe2icMzz
— BCCI (@BCCI) December 29, 2020
-
-
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सने शानदार विजय
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दुसऱ्या कसोटीत 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे.
-
भारताला दुसरा धक्का
भारताला दुसरा धक्का बसला आहे. मयंक पाठोपाठ चेतेश्वर पुजाराही आऊट झाला आहे.
-
टीम इंडियाला पहिला धक्का
टीम इंडियाला पहिला धक्का बसला आहे. मयंक अग्रवालने दुसऱ्या डावतही निराशा केली आहे. मंयक 5 धावा करुन बाद झाला आहे.
-
-
भारतीय बोलर्सचा टिच्चून मारा, ऑस्ट्रेलिया 200 रन्सवर ऑलआऊट, भारताला जिंकण्यासाठी 70 रन्सचं आव्हान
AUS vs IND, 2nd Test 4th Day Live : भारतीय बोलर्सचा टिच्चून मारा, ऑस्ट्रेलिया 200 रन्सवर ऑलआऊट, भारताला जिंकण्यासाठी 70 रन्सचं आव्हानhttps://t.co/nffFV2rQkq#INDvsAUS #AusVsInd
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
-
ऑस्ट्र्लियाला नववा धक्का, लायन मोहम्मद सिराजची शिकार
AUS vs IND, 2nd Test 4th Day Live : ऑस्ट्र्लियाला नववा धक्का, लायन मोहम्मद सिराजची शिकारhttps://t.co/nffFV2rQkq
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
-
ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का, कॅमरुन ग्रीन आऊट
AUS vs IND, 2nd Test 4th Day Live : ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का, कॅमरुन ग्रीन आऊटhttps://t.co/nffFV2rQkq
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
-
स्लिपमध्ये अग्रवालकडे कॅच, बुमराहच्या शॉर्ट बॉलवर कमिन्स फसला
AUS vs IND, 2nd Test 4th Day Live : स्लिपमध्ये अग्रवालकडे कॅच, बुमराहच्या शॉर्ट बॉलवर कमिन्स फसला, ऑस्ट्रेलियाला सातवा धक्काhttps://t.co/nffFV2rQkq#indvsausTestmatch #Ausvsindia
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020